शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

लाखनीत घनकचरा व्यवस्थापन अद्यापही बाल्यावस्थेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 00:38 IST

येथे नगर पंचायतीची निर्मिती होऊन चार वर्षे झाली तरी घनकचरा व्यवस्थापन अद्यापही बाल्यावस्थेतच आहे. नगर पंचायतीकडे स्वत:चा मालकीचे डम्पिंग यार्डही नाही. त्यामुळे ओला व सुका कचरा लाखोरी रोडवर टाकला जातो. परिणामी संजय नगर, संताजी मंगल कार्यालय परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे.

ठळक मुद्देडम्पिंग यार्डचा अभाव : रस्त्यावरच कचऱ्याचे ढिगारे, दुर्गंधीने आरोग्य धोक्यात

चंदन मोटघरे ।लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : येथे नगर पंचायतीची निर्मिती होऊन चार वर्षे झाली तरी घनकचरा व्यवस्थापन अद्यापही बाल्यावस्थेतच आहे. नगर पंचायतीकडे स्वत:चा मालकीचे डम्पिंग यार्डही नाही. त्यामुळे ओला व सुका कचरा लाखोरी रोडवर टाकला जातो. परिणामी संजय नगर, संताजी मंगल कार्यालय परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे.नगर पातळीवर कचरा व्यवस्थापनाचे नियोजन, कचरा वर्गीकरण, कचरा गोळा करणे, त्याची विल्हेवाट आदी बाबींवर लक्ष केंद्रीत करावे लागते. संपूर्ण स्वच्छता अभियानांतर्गत एकुण निधीच्या दहा टक्के रक्कम घनकचरा व्यवस्थापनावर वापरता येते. घनकचºयाचे निर्मुलन करताना कचरा निर्मितीच्या जागा व त्यानुसार व्यवस्थेचा विचार केला जातो. घनकचरा सार्वजनिक जागीही निर्माण होतो. दुकाने आठवडी बाजार, शाळा, मंदिर, लग्नसमारंभ आदी ठिकाणी भरपूर केरकचरा निर्माण होतो. घनकचराची निर्मिती घराघरातून होत असल्याने गोळा होणारे घनकचराचे प्रमाण व त्याचा दर्जावर नियंत्रण ठेवता येत नाही. परिणामी त्याची साठवण, वाहतुक व्यवस्था व त्यावरिल प्रक्रियेचे डिझाईन लाखनी नगर पंचायतीजवळ तयार नाही.लाखनी नगरपंचायतीने कोट्यवधीचा निधी सिमेंट रस्ते, नाल्या तयार करण्यावर खर्च केला आहे. शासन स्वच्छता मोहीमेवर भर देत आहे. परंतु नगर पंचायत याकडे दुर्लक्ष करीत आहे. या कचºयामुळे दुर्गंधी पसरत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कचरा टाकला जातो त्या परिसरातील नागरिकांना राहणे कठीण झाले आहे.नगरसेवक धनु व्यास म्हणाले, शहरापासून सात-आठ किलोमिटर अंतरावर डम्पिंग यार्ड असण्याचा नियम आहे. काही लोक हेतुपरस्सर कचºयाच्या ढिगाºयाला आग लावतात. नगर पंचायत स्वच्छता व कचरा व्यवस्थापनाकडे लक्ष पुरवित आहे.डम्पिंग यार्डच्या जागेचे भिजत घोंगडेलाखनी नगरपरिषदेला घनकचरा व्यवस्थापनासाठी दोन ते पाच एकर जमीन हवी आहे. शहराच्या आसपास एवढीमोठी शासकीय जमीन उपलब्ध नाही. त्यामुळे खाजगी जमीन विकत घेण्याची निविदा काढण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. तो प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात गेला आहे. जमीन खरेदी-विक्रीचा प्रस्तावाला अंतीम रुप मिळाले नाही. लाखनीची लोकसंख्या १२ हजार आहे. प्रत्येक प्रभागात कुंड्या आहेत. गल्लोगल्लीत कचरा गोळा करण्याचे डब्बे आहेत. घराघरात प्रत्येक कुटूंबाला डस्टबिन दिले आहेत. परंतु गोळा झालेल्या कचºयाचे काय करावे हा नेमका प्रश्न आहे.

टॅग्स :dumpingकचरा