शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनने हिरावले चिमुकल्यांचे मैदानी खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:33 IST

लाखांदूर : आजची तरूण पिढी मोबाईलच्या आहारी अतिप्रमाणात गेली आहे. त्यामुळे अनेक लहान मुले मैदानी खेळ विसरत चालली आहेत. ...

लाखांदूर : आजची तरूण पिढी मोबाईलच्या आहारी अतिप्रमाणात गेली आहे. त्यामुळे अनेक लहान मुले मैदानी खेळ विसरत चालली आहेत. त्यामुळे त्यांच्यात शारीरिक व मानसिक विकार जडत आहेत. त्यामुळे ‘मोबाईल टाळा, मैदानी खेळ खेळा ’ अशी आज्ञाही आता कोरोनामुळे चिमुकल्यांना पालकांना देता येत नाही. संचारबंदी असल्याने लहान बालकांना घराबाहेर पडणे कठीण झाल्याने लॉकडाऊनने चिमुकल्यांचे मैदानी खेळ हिरावले असल्याचे चित्र पहावयास मिळत असून ज्येष्ठ नागरिकात त्याबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.

मैदानी खेळ म्हणजे जे खेळ मैदानावर खेळले जातात. या खेळाने संपूर्ण शरीराची हालचाल होते. मैदानी खेळ खेळण्यानेच शरीर स्वस्थ राहते. शरीराचा व्यायाम होतो, आणि शरीर तंदुरुस्त राहते. मैदानी खेळ हे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. काही खेळ हे एकट्याने खेळायचे असतात तर काही अनेक खेळाडू एकत्र येऊन खेळले जातात. या खेळांमध्ये क्रिकेट, फुटबॉल, उंच उडी, लगंडी, खो-खो, कबड्डी, बॅडमिंटन, बास्केटबॉल, थ्रोबॉल, पकडापकडी, आशा विविध खेळांचा समावेश आहे.

कोविड चाचणी दरम्यान राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्ण आढळून येत असल्याने राज्य शासनाने लॉकडाऊन करीत संचारबंदीचे आदेश निर्गमित केले आहेत. राज्यातील अत्यावश्यक दुकाने वगळता इतर सर्व दुकाने, आस्थापने , शाळा , महाविद्यालये बंद पाडण्यात आल्याने सगळीकडे लहान बालके घरातच दिसून येत आहेत.

दरवर्षी उन्हाळा आला की सर्वांना सुट्या लागायच्या. लहान बालके या सुट्यांचा मनसोक्त आनंद घेत असत. कुठलाही शालेय अभ्यास या कालावधीत नसल्याने त्यांचा संपूर्ण वेळ खेळण्यात जात असे. या खेळण्यामध्ये ते मैदानी खेळ मोठ्या प्रमाणात खेळताना देखील दिसायचे. उन्हाळ्यात ग्रामीण भागात आंब्याच्या झाडावर चढून आंबे तोडणे , दगडाने आंबे पाडणे यांसह अन्य खेळ खेळताना दिसत होते. मात्र गतवर्षीप्रमाणे यंदाही लॉकडाऊन लागल्याने बालकांना कोरोनाचा संसर्गामुळे घरातील मंडळीच बाहेर पडू देत नसल्याने त्यांचे मैदानी खेळ सध्यातरी हिरावल्याचे वास्तव आहे.

उन्हाळ्याच्या सुटीत समर कॅम्पचे आयोजन केले जात होते. या समर कॅम्पमध्ये मोठ्या प्रमाणावर मुले सहभागी होतात. यंदाही विविध क्रीडा प्रशिक्षकांनी समर कॅम्पचे नियोजन केले होते. मात्र, कोरोना विषाणूने घात केला आहे. मार्च महिन्यांपासून टाळेबंदी जाहीर झाली आणि समर कॅम्पच्या नियोजनावर पाणी फेरले गेले. कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मैदानेच बंद पडल्याने लॉकडाऊनने चिमुकल्यांचे मैदानी खेळच हिरावल्याचे सर्वत्र बोलले जात आहे.