शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामस्थांनी ठोकले शाळेला कुलूप

By admin | Updated: August 19, 2014 23:32 IST

शालेय पोषण आहार अफरातफर प्रकरणी दोषींवर कारवाई आणि शिक्षकाच्या बदलीच्या मागणीसाठी जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेला गावकऱ्यानी आज कुलूप ठोकले. यामुळे शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली.

विरली बु. : शालेय पोषण आहार अफरातफर प्रकरणी दोषींवर कारवाई आणि शिक्षकाच्या बदलीच्या मागणीसाठी जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेला गावकऱ्यानी आज कुलूप ठोकले. यामुळे शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली. पाहुणगाव येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत इयत्ता १ ते ७ वर्ग असून १५२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेत मागील वर्षीचे सत्रात ८८ किलो तुरडाळ, ३२ किलो चना, ३० किलो मजूर दाळ असे दीड क्विंटल धान्य शिल्लक होते. मुख्याध्यापक डी.के. जळीत यांनी शाळेतीलच एका शिक्षकाला धान्य विकल्याची माहिती गावात कळली. गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली. याप्रकरणी वरिष्ठ अधिकारी दोषीवर कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. त्याच प्रमाणे येथील सहायक शिक्षक आर.एम. तोंडरे यांच्या बदलीसाठी शाळा व्यवस्थापन समितीने २ मे २०१३ ला ठराव घेवून गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे बदलीची मागणी केली होती. शिक्षक मुख्यालय राहत नसल्याने त्यांचा घरभाडे भत्ता बंद करावा, पोषण आहार शिजविण्याचे काम महिला बचत गटाकडे कायम ठेवावे आदी मागण्यांसाठी संतप्त गावकऱ्यांनी शाळेला कुलूप ठोकले. याची माहिती गटशिक्षणाधिकारी डी.के. पडोळे, वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी टी.बी. अंबादे, एल.डब्ल्यु. मेश्राम यांनी शाळेला भेट देवून गावकऱ्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला. मात्र गावकरी सहायक शिक्षक तोंडरे यांच्या बदलीवर ठाम राहिल्याने अधिकाऱ्यांना आल्यापावली परतावे लागले. यावेळी सरपंच देविदास राऊत, शाळा व्यवस्थापन समितीचे ईश्वर दोनाडकर, कविता हटवार, उपसरपंच गोपाल मेंढे, वर्षा मेश्राम, उषा खरकाटे, अभिमन ढोंगे, दिनेश कोरे, राजेंद्र कोरे, शिवशंकर वाघमारे, हरीदास पोराम, वासूदेव तोंडरे, अन्ना गायधने उपस्थित होते. (वार्ताहर)