पाच लाख रुपयांची दारु पकडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 00:59 IST2018-10-01T00:58:35+5:302018-10-01T00:59:01+5:30
मालवाहू वाहनातून दारुबंदी असलेल्या जिल्ह्यात दारुची तस्करी करित असताना जिल्हा रेड पथकाने रंगेहाथ पकडले ही कारवाई शनिवारी सायंकाळच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील पिंपळगाव शिवारात केली.

पाच लाख रुपयांची दारु पकडली
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : मालवाहू वाहनातून दारुबंदी असलेल्या जिल्ह्यात दारुची तस्करी करित असताना जिल्हा रेड पथकाने रंगेहाथ पकडले ही कारवाई शनिवारी सायंकाळच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील पिंपळगाव शिवारात केली. याप्रकरणी धरमु कुमार उदरुपाका रा. अर्जुनी मोरगाव याला अटक करण्यात आली आहे. या कारवाईत पाच लक्ष वीस हजार रुपयांच्या दारुसह वाहन जप्त करण्यात आले.
लाखांदूर तालुक्याला लागून असलेल्या वडसा येथे लाखांदूर मार्गे दारुची अवैध वाहतुक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. याच दरम्यान पेट्रोलिंगवर असलेल्या जिल्हा रेड पथकातील प्रमुख पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र आडोळे यांनी याबाबत सहकाऱ्यांना माहिती दिली. याशिवाय जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांच्या मार्गदर्शनात कारवाई केली.
यात अर्जुनी मोरगाव येथून मालवाहक वाहन क्रमांक एम एच ३५ के ४१७८ मधून दारुची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली. पथकाने लाखांदूर परिसरातील पिंपळगाव शिवारात सदर वाहन पकडले. यावेळी चालक उदरुपाका याने वाहनातून उडी घेवून पळून जाण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.
यात त्याला दुखापतही झाली. पोलिसांनी वाहनातून खडर्््याच्या पेटीत देशी दारुने भरलेले १०० बॉटल व अन्य १०० अशा पाच लक्ष २० हजार रुपयांची दारु जप्त केली.
तसेच चारचाकी वाहनही जप्त करण्यात आले. लाखांदूर पोलिसांनी अर्जुनी मोरगाव येथील दारु दुकान मालक कुमार विरय्या उदरुपाका व गाडीचालक याच्याविरुध्द महाराष्टÑ दारुबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र आडोळे, सहा. फौजदार अश्विनकुमार मेहर, पोलीस हवालदार रुपचंद जांगळे, पोलीस नाईक प्रदिप डाहारे, विनोद शिवणकर, सचिन गाढवे यांनी केली आहे.