शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
3
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
5
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
6
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
7
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
8
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
9
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
10
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
11
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
12
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
13
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
14
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
15
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
16
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
17
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
18
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
19
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर

जीवनावश्यक सेवेतील वाहन चालकांना लाखनीकरांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2020 5:00 AM

आता लॉकडाऊनने सर्व ठप्प आहे. परंतु लोकांच्या गरजा भागविण्यासाठी महामार्गावरून ट्रक धावत आहे. अन्नधान्य, भाजीपाला, फळे, औषधे आदी जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक अविरतपण होत आहे. अनेक दिवस घराच्या बाहेर राहून सामानाची पोहच दूरवर अंतरावर करणारे ट्रकचालक खरोखरच भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे.

ठळक मुद्देलॉकडाऊनमध्ये आधार : हॉटेल, धाबे बंद असल्याने होत होती परवड

चंदन मोटघरे।लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : लॉकडाऊनमुळे हॉटेल, धाबे बंद असल्याने जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांची आबळ होत होती. हजारो किलोमीटरचा प्रवास करताना भोजनासह विविध सुविधांचा अभाव होता. ही अडचण ओळखून लाखनी येथे अशोका बिल्डकॉन कंनीने विश्रांतीसाठी जनसुविधा तयार केली. तेथे येणाऱ्या वाहनचालकांना लाखनीवासीयांतर्फे जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जात आहे. त्यामुळे या वाहन चालकांना मोठा आधार मिळाला आहे.राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वर लाखनी हे तालुक्याचे ठिकाण आहे. भंडारा जिल्ह्यातील ट्रांसपोर्टनगरी म्हणून लाखनीचा उल्लेख केला जातो. शहर व मानेगाव या दरम्यान राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अशोका बिल्डकॉन कंपनी करत आहे. मात्र आता लॉकडाऊनने सर्व ठप्प आहे. परंतु लोकांच्या गरजा भागविण्यासाठी महामार्गावरून ट्रक धावत आहे. अन्नधान्य, भाजीपाला, फळे, औषधे आदी जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक अविरतपण होत आहे. अनेक दिवस घराच्या बाहेर राहून सामानाची पोहच दूरवर अंतरावर करणारे ट्रकचालक खरोखरच भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे. अनेक दिवस आपल्या कुटुंबापासून दूर राहून ट्रक चालक एकप्रकारे जनतेची सेवा करीत आहेत. स्थानिक राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ जुना क्रमांक हा १९४९ किलोमीटर अंतराचा आहे. याला एशियन हायवे ४६, मुंबई कलकत्ता हायवे, ग्रॅन्ट इस्टर्न हायवे म्हणून ओळखला जातो. राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ हा गुजरात, महाराष्ट्र, छत्तीसगड, ओरिसा, झारखंड, पश्चिम बंगालपर्यंत सहा राज्यातून जात असतो. हा महामार्ग धुळे, जळगाव, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा या शहरातून जात असतो. सदर महामार्गावरून औषधे, मत्स्यबिज, भाजीपाला, फळे व इतर वस्तूची वाहतूक २४ तास सुरु असते. लाखनी येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर भंडारापासून ते मुंडीपार (सडक) पर्यंत ढाबे आहेत. त्याठिकाणी ट्रकचालक वाहने थांबवून जेवण करून आराम करायचे व पुढच्या प्रवासाला निघायचे. लॉकडाउनमुळे धाबे, हॉटेल बंद आहेत. त्यामुळे ट्रकचालकाची आबाळ होत आहे. अनेक ट्रकचालक स्वत: स्वयंपाक करून भोजन करतात. त्याकरिता लाखनी नजीकच्या जनसुविधेचा आधार घेतात.एक दिवा त्यांच्यासाठीलॉकडाऊनच्या परिस्थितीत महामार्गावर वाहनांची संख्या कमी आहे. काही जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाºया ट्रकला परवानगी दिली जात आहे. तर काही ठिकाणी ट्रक थांबलेली दिसून येत आहेत. आपल्या घरादारापासून दूर राहून हजारो किमी अंतराचा प्रवास करून माल पोहचविणाºया ट्रकचालकांचे आपल्या दळणवळण व्यवस्थेत महत्वाचे योगदान आहे. म्हणून एक दिवा त्यांच्यासाठी ही पेटवला जावा.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsocial workerसमाजसेवक