शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

लाखांदूर तालुक्यात हागणदारीमुक्ती कागदावरच

By admin | Updated: May 5, 2017 00:40 IST

शासनाने लाखांदूर पंचायत समिती हागणदारीमुक्त घोषित करून पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी हारतुरे स्वीकारले.

स्वच्छ भारत अभियानाचा फज्जा : गावागावात आजही उघड्यावरच शौचविधी हरिश्चंद्र कोरे विरली (बु.) शासनाने लाखांदूर पंचायत समिती हागणदारीमुक्त घोषित करून पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी हारतुरे स्वीकारले. लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांकडून पाठ भोपटून शाबासकी मिळविली. मात्र प्रत्यक्षात लाखांदूर पंचायत समितीतील अनेक गावातील नागरिक अद्यापही उघड्यावरच शौचासाठी जात आहेत, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे लाखांदूर पंचायत समितीची हागणदारीमुक्त अभियान केवळ कागदावरच असल्याचे दिसून येत आहे. आपला गाव व परिसर स्वच्छ व हागणदारीमुक्त करण्याच्या उद्देशाने केंद्र व राज्य शासनाने स्वच्छ भारत अभियान राबविण्याचा निर्णय घेतला. या अभियानांतर्गत वैयक्तीक शौचालयाच्या बांधकामासाठी १२ हजार रूपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येते. भंडारा जिल्ह्यात या अभियानाची युद्धस्तरावर अंमलबजावणी करण्यात आली. प्रत्येक पंचायत समितीला वैयक्तीक शौचालय बांधकामाचे ठराविक उद्दीष्ट देऊन मार्च २०१७ पर्यंत उद्दिष्ट पूर्ण करण्याचे लक्ष्य देण्यात आले. मात्र प्रशासकीय यंत्रणेकडून हे उद्दिष्ट निश्चित करताना प्रत्येक गावातील शौचालयांची सद्यस्थिती विचारात घेण्यात आलेली नाही. चार-पाच वर्षांपूर्वी निर्मलग्राम घोषित झालेल्या गावांना या अभियानातून वगळण्यात आले. आणि येथेच स्वच्छ भारत अभियानाला सुरूंग लागला आहे. लाखांदूर पंचायत समितीमध्ये ६२ ग्रामपंचायती येतात. यापैकी ९ ग्रामपंचायत सन २०१५-१६ मध्ये हागणदारीमुक्त झाल्या होत्या. ११ ग्रामपंचायत निर्मलग्राम म्हणून घोषित झाल्या होत्या. स्वच्छ भारत अभियान २०१७ साठी पंचायत समितीला ४२ ग्रामपंचायतीमध्ये १० हजार ४४८ वैयक्तीक शौचालयांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. हे उद्दिष्ट गाठून पंचायत समितीने हागणदारीमुक्त होण्याचा मान पटकावला. मात्र प्रत्यक्षात चार-पाच वर्षांपूर्वी निर्मलग्राम घोषित झालेल्या गावांचे निर्माल्य केव्हाचेच लोप पावले आहे. याकडे प्रशासनाने दुर्लक्ष झाल्यामुळे या गावांच्या सद्यस्थितीचा फेरआढावा घेण्याची तसदी प्रशासनाने घेतलेली नाही. गरज आठ कोटीची मदत ५० लाखाची मोहाडी तालुक्यात सन २०१५-१६ या वर्षात ७७ ग्रामपंचायतींना १०,६८४ शौचालयांचे उद्दिष्ठ देण्यात आले. वर्षभरात १०,६५० शौचालयांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. उद्दिष्ठापैकी ३,५०० लाभार्थ्यांना अनुदानाचे वाटप झाले असून ७,१८४ लाभार्थी प्रतिक्षेत आहेत. यासाठी ८ कोटी ६२ लाख रूपयांच्या अनुदानाची गरज असताना एप्रिल महिन्यात मोहाडी पंचायत समितीला केवळ ४२० शौचालयांचे ५० लाख ४० हजाराचे अनुदान प्राप्त झाल्याने लाभार्थ्यांत असंतोष पसरला आहे. त्यामुळे प्रती गाव १० टक्के याप्रमाणे अनुदान वाटप करण्याचे निर्देश खंड विकास अधिकाऱ्यांनी संबंधित विभागाला दिले आहे. लाखांदूर तालुका हागणदारीमुक्त झाल्याचे सांगून प्रशासनाने गाजावाजा करीत कार्यक्रम घेतला होता. या कार्यक्रमात लोकप्रतिनिधीसह तत्कालीन जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे स्वच्छता पाणी मिशनचे अधिकारी सहभागी झाले होते.