शहरं
Join us  
Trending Stories
1
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
2
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
3
१२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
4
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
5
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
6
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
7
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
8
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
9
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
10
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
11
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
12
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
13
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
14
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
15
Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!
16
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
18
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
19
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
20
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?

खैरलांजीत आजही आठवणींचा काहूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:38 IST

भंडारा : खैरलांजी नाव उच्चारताच आजही अंगावर शहारे येतात. भाेतमांगे परिवारातील चाैघांची अमानुष हत्या झाली. ताे पट सर्रकन डाेळ्यापुढे ...

भंडारा : खैरलांजी नाव उच्चारताच आजही अंगावर शहारे येतात. भाेतमांगे परिवारातील चाैघांची अमानुष हत्या झाली. ताे पट सर्रकन डाेळ्यापुढे येताे. समाजमन हेलावून टाकणाऱ्या या घटनेचा खैरलांजीत साक्षीदार आहे, ताे भाेतमांगे परिवाराचा उघड्यावर असलेला लाेखंडी पलंग. या हत्याकांडाच्या कटु आठवणी सांभाळत आता गावात सामाजिक एकाेपा नांदताेय. गाव विकासाची कास धरून प्रगतीचे पाऊल टाकत आहे. मात्र, घटनेची धग आजही कायम आहे. दीड दशक झाले तरी आठवणींचा काहूर दाटून येताे. संपूर्ण देशच नव्हे तर जागतिक पातळीवर या हत्याकांडाचे पडसाद उमटले हाेते. गावाच्या एका टाेकावर राहणाऱ्या भैय्यालाल भाेतमांगे यांच्या कुटुंबातील चार सदस्यांची निर्घृण हत्या झाली हाेती. ताे काळाकुट्ट दिवस हाेता, २९ सप्टेंबर २००६. भैय्यालाल भाेतमांगे यांची पत्नी सुरेखा, मुलगी प्रियंका आणि राेशन व सुधीर या दाेन मुलांची हत्या करण्यात आली. अमानुषपणे त्यांचे मृतदेह कालव्यात फेकून दिले. भैय्यालाल शेतावर असल्याने ते या भीषण हल्ल्यात बचावले. संपूर्ण देश या हल्ल्याने हादरून गेला हाेता. विधानसभेपासून संसदेपर्यंत चर्चा झाली. न्यायाच्या लढाईसाठी रस्त्यावर आंदाेलनेही झाली. या हत्याकांडानंतर तब्बल एक महिन्यानंतर खटला सुरू झाला. १५ ऑक्टाेबर २००८ राेजी भंडारा सत्र न्यायालयाने आठ जणांना दाेषी ठरविले. आता या घटनेला दीड दशक झाले आहे. भाेतमांगे परिवारातील कुणीही खैरलांजीत राहत नाही. रहायला कुणी त्या कुटुंबातील जिवंतही नाही. भैय्यालाल भाेतमांगे यांचाही २० जानेवारी २०१७ राेजी हृदयविकाराने मृत्यू झाला. खैरलांजीत त्यांची काही वर्षापर्यंत झाेपडी हाेती. आता तीही उद्ध्वस्त झाली असून त्याठिकाणी गवत वाढले आहे. या गवतात एकमेव लाेखंडी पलंग २९ सप्टेंबर २००६ च्या रात्री घडलेल्या थरार नाट्याचा साक्षीदार आहे. दीड दशकापूर्वी घडलेल्या घटनेची धग आजही या गावात जाणवते. बाहेरील कुणी अनाेळखी व्यक्ती गावात आला की, सर्वांच्या नजरा त्याच्यावर खिळतात. हत्याकांडाचा विषय काढला की, कुणी फारसे बाेलायला तयारही नसतात. मात्र, या कटु आठवणी हृदयात साठवत गावकऱ्यांनी सामाजिक एकाेपा निर्माण केला आहे. विकासाची कास धरत प्रगतीकडे वाटचाल करीत आहे. आता गावात कुठे भांडण तंटा नाही की कुणाबद्दल आकसही नाही. आपण भले आणि आपले काम अशी स्थिती या गावातील नागरिकांची आहे. मात्र, आजही खैरलांजीच्या त्या घटनेचा काहूर प्रत्येकाच्या मनात दाटलेला दिसून येताे.

बाॅक्स

झाेपडी जमीनदाेस्त, लाेखंडी पलंग देताे साक्ष

खैरलांजी गावाच्या एका टाेकावर भैय्यालाल भाेतमांगे यांचे झाेपडीवजा घर हाेते. या झाेपडीत पाच जणांचे कुटुंब वास्तव्याला हाेते. हत्याकांडानंतर भैय्यालाल भाेतमांगे भंडारा येथे वास्तव्याला आले. या झाेपडीत कुणाचेच वास्तव्य नसल्याने आता ती झाेपडी पूर्णत: जमीनदाेस्त झाली. झाेपडीच्या ठिकाणी आता घरातील एकमेव लाेखंडी पलंग आहे. या पलंगालाही गंज चढला असून अवतीभाेवती गवत आणि झुडपी वनस्पती वाढली आहे. पंधरा वर्षात बदल काय झाला असेल तर या झाेपडीपुढे असलेला कच्चा रस्ता आता सिमेंटचा झाला आणि घटनेच्यावेळी छाेटासा असलेला वृक्ष आज चांगलाच माेठा झाला. या ठिकाणाला भेट दिली तेव्हा हत्याकांडाच्या आठवणीने अंगावर काटा आला.