शहरं
Join us  
Trending Stories
1
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
2
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
3
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७८ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
4
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
5
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
6
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
7
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
8
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
9
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
10
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
11
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
12
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
13
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
14
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
15
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
16
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
17
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
18
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
19
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
20
धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात

कमकासुरात 'काळी' दिवाळी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 21:45 IST

बावनथडी प्रकल्पात बेघर झालेल्या कमकासुरवासीयांचे करण्यात आलेल्या पुनर्वसन गावात कोणतीही नागरी सुविधा पुरविल्या गेली नसल्याने प्रकल्पग्रस्त आदिवासी पुनर्वसन गाव सोडून मुळ गावी परतले.

ठळक मुद्देटाहो फोडणार : जिल्ह्यातील आदिवासी संघटना एकवटल्या

राहुल भुतांगे ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : बावनथडी प्रकल्पात बेघर झालेल्या कमकासुरवासीयांचे करण्यात आलेल्या पुनर्वसन गावात कोणतीही नागरी सुविधा पुरविल्या गेली नसल्याने प्रकल्पग्रस्त आदिवासी पुनर्वसन गाव सोडून मुळ गावी परतले. परंतु प्रशासनाने थातूरमातूर दखल घेतल्याचे दर्शवून आदिवासीयांची एक प्रकारे बोळवण केली आहे. परिणामी दोन दिवस शासन व प्रशासनाचा प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून त्यांच्या विरोधात टाहो फोडून कमकासुरात काळी दिवाळी साजरी करणार असल्याचा निर्धार आदिवासींनी केला आहे.महाराष्ट्र व मध्यप्रदेशाला जोडणाºया महत्वकांशी बावनथडी प्रकल्पात बाधीत होणाºया गावाचे शासनामार्फत तुटपुंजी मदत सन २००६ मध्ये जमिनीचा अवार्ड करून जमिन अधिग्रहन करण्यात आली. त्यावेळी ही गावकºयांनी विरोधच केला होता. मात्र शासनामार्फत आदिवासी यांना दिव्य स्वप्ने दाखविण्यात आली. सुशिक्षितांना नौकरी, अशिक्षीताना कौशल्य रोजगार, चांगले घरे, दिवाबत्तीची सोय, सांडपाण्याकरिता नाली, चांगले आरोग्य, उत्कृष्ठ शिक्षण अशा अनेक भुलथापा आदिवासी यांना देवून बंदुकीच्या धाकावर प्रकल्पाच्या गळभरणी करतेवेळेस जोर जबरदस्तीने त्यांच्या मुळ गावातून त्यांना हाकलण्यात आले. मात्र तितक्याच पोट तिडकिने, पुनर्वसित गावात एकही सुविधा पुरविली गेली नाही. उपजिविकेचे कोणतेच साधनही देण्यात आले नाही.परिणामी पुनर्वसन झालेल्या गावात आदिवासीयावर उपासमारीची वेळ ओढविल्यामुळे आदिवासीयांनी पुनर्वसन गाव सोडून मुळ गावीच जाण्याचा संकल्प केला व ५ आॅक्टोबरला कुटुंबासह आदिवासी मुळ गाव कमकासुर येथे पोहचले.कमकासूर हे गाव तुमसर तालुक्याच्या ठिकाणापासून ७० कि़मी. अंतरावर घनदाट जंगलात आहे तिथे ये-जा करण्यासाठी रस्ते नाही, वीज नाही. त्यामुळे सायंकाळी ५ वाजताच रात्रीचे १० वाजल्याची अनुभती त्या ठिकाणी येते. ईतकेच नव्हे तर सदर परिसरात वाघ बिबट, रानडुक्कर, अस्वल सारखे जंगली व हिस्त्र प्राण्यांचा वावर तिथे आहे. अशा भयावह ठिकाणी आदिवासी गत १० दिवसापासून राहत आहे. मात्र प्रशासनाने आदिवासी यांच्या समस्येकडे दुर्लक्ष केला. दरम्यान जलसमाधीचा इशारा देताच प्रशासनाचे अधिकारी कसे बसे पोहचले परंतू त्याने आदिवासीयांचा समाधान झाला नाही. जिल्हाधिकाºयाने स्वत: येवून आमच्या समस्या ऐकूण घ्याव्यात अशी त्यांची मागणी आहे. परंतू त्यांच्या मागणीकडे सतत दुर्लक्ष होत असल्यामुळे कमकासुरात प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून काळी दिवाळी साजरी करणार आहेत.आंदोलनाला जिल्ह्यातील आदिवासी संघटनेने पाठींबा दिला आहे. आदिवासी बांधवांनी काळी दिवाळी साजरी करण्यावर एकमत झाले.-अशोक उईके, आदिवासी नेता.मुळगावी गेलेल्या आदिवासीयांचे जगणे कठिण झाले असून त्यांची उपासमार टाळण्याकरिता समाजसेवेच्या दृष्टकोनातून अन्यधान्य पुरविण्यास तोकडी मदत करित आहे.-तोफलाल राहांगडाले, माजी सरपंच डोंगरी बुज.जिल्हाधिकारी यांनी स्वत: येवून समस्या ऐकूण घ्याव्यात व तातडीने त्यावर उपाय योजना करावी, ऐवढेच म्हणने आहे.-किशोर उईके, सरपंच कमकापूर.