शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
8
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
9
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
10
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
11
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
12
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
13
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
14
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
15
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
16
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
17
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
18
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

काका, आमचा नवोदयचा रिझल्ट केव्हा लागणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 12:49 AM

आम्ही रात्रभर जागून अभ्यास केला. दररोज रिझल्टची वाट पाहतो परंतु रिझल्ट लागत नाही, आता आम्ही दुसऱ्या शाळेत प्रवेश घेतला. आम्हचा रिझल्ट केव्हा लागणार असा आर्त सवाल नवोदय विद्यालयाची प्रवेश परिक्षा दिलेल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी गुरुवारी येथे एका पत्रकार परिषदेत केला.

ठळक मुद्देपत्रपरिषदेत विद्यार्थ्यांचा सवाल : देशभरात केवळ भंडाराचा निकाल अडला, पालकांचा उपोषणाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आम्ही रात्रभर जागून अभ्यास केला. दररोज रिझल्टची वाट पाहतो परंतु रिझल्ट लागत नाही, आता आम्ही दुसऱ्या शाळेत प्रवेश घेतला. आम्हचा रिझल्ट केव्हा लागणार असा आर्त सवाल नवोदय विद्यालयाची प्रवेश परिक्षा दिलेल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी गुरुवारी येथे एका पत्रकार परिषदेत केला. यावेळी त्यांच्यासोबत पालकही उपस्थित होते. निकाल लवकर लागला नाहीतर उपोषणाला बसण्याचा इशारा या पालकांनी यावेळी दिला.नवोदय विद्यालयाच्या प्रवेशासाठी देशभरात परीक्षा घेण्यात आली. भंडारा जिल्ह्यातील सहा हजार २०० विद्यार्थी या परिक्षेला बसले होते. २१ एप्रिल रोजी झालेल्या परीक्षेतून ८० विद्यार्थ्यांनी नवोदय विद्यालयाची निवड केली जाणार होती. संपूर्ण देशाच्या नवोदय प्रवेश परीक्षेचा निकाल घोषित झाला. परंतू एकमेव भंडारा जिल्ह्यातील परीक्षेचा निकाल मात्र रखडला आहे. आज लागेल, उद्या लागेल असे करीत आज पाच महिने झाले तरीही निकाल लागला नाही. पालकांनी याबाबत जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले, परंतु उपयोग झाला नाही. नवोदय विद्यालयासाठी जागा नसल्याचे कारण पुढे करत हा निकाल रोखून ठेवल्याची माहिती आहे.या सर्व प्रकाराने त्रस्त झालेले विद्यार्थी आपल्या पालकांसह गुरुवारी येथील विश्रामगृहात एकत्र आले. त्यांनी पत्रकारांना आपली व्यथा सांगितली. बेला येथील जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थीनी हंशीका वानखेडे म्हणाली, आम्हाला लवकरात लवकर रिझल्ट हवा आहे, आम्ही रात्र जागून अभ्यास केला. परंतु निकाल का देत नाही, असा सवाल तिने केला. रॉयल पब्लिक स्कूलचा विद्यार्थी सोहम बोरकर म्हणाला, सर्व देशाचा निकाल लागला पंरतु आमचा का लागत नाही, असा प्रश्न त्याने उपस्थित केला. यावेळी प्रतीक्षा बोरकर, गायत्री राखडे, सानीया नंदागवळी, अन्वी कांबळे, संघर्षी गेडाम, संस्कार रामटेके, लावण्य चाचेरे, हिमांशु कुलरकर, चाणक्य मेनपाले, आर्यन सुर्यवंशी, विवेक वाडेकर, सोनाली भोवते आदी विद्यार्थ्यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. निकालाच्या प्रतीक्षेत वर्ष वाया जावू नये म्हणून या विद्यार्थ्यांनी आता सहाव्या वर्गात पैसे भरुन प्रवेश घेतला आहे. त्यामुळे पालक संतप्त झाले आहे. लवकरच निकाल घोषित झाला नाही तर आम्ही उपोषण करु असा इशारा पालकांनी दिला. प्रशासनाविरुध्द यावेळी रोष व्यक्त करण्यात आला. आता प्रशासन कोणती भूमिका घेत याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी