आंब्याच्या रसात तूप खाण्याचा फायदा असतो की तोटा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 15:33 IST2025-04-26T15:32:35+5:302025-04-26T15:33:17+5:30

Bhandara : ३० दिवसांपासून बाजारात विक्रीसाठी रसाचे आंबे आले आहे

Is there any benefit or disadvantage to eating ghee with mango juice? | आंब्याच्या रसात तूप खाण्याचा फायदा असतो की तोटा?

Is there any benefit or disadvantage to eating ghee with mango juice?

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा :
हंगाम सुरू असून, आमरस प्रत्येकाच्या घरी आवडीने बनवला जात आहे. अक्षय तृतीयेला आमरसाचे विशेष महत्त्व असते. त्यात तूप मिसळून त्याचा स्वाद दुप्पट होतो. या तुपाचा काही प्रमाणात फायदा असला तरी जास्त वापर झाल्याने ते हानिकारकही ठरू शकते.


फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून भंडाऱ्यातील बाजारपेठेत आंबा दाखल झाला आहे. आता आंब्याची मागणी वाढल्याने बाजारात आवकही वाढली आहे. हापूससोबत बैगनपल्ली, दसेरी, लंगडा, केसर व इतर जातींचा आंबा बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे. आहारतज्ज्ञांच्या मते, आमरसात तूप मिसळणे फायदेशीर असू शकते. तुपामध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड्स असतात, जे हृदयासाठी फायदेशीर ठरतात. तूप पचन तंत्राला मदत करते आणि शरीराला आवश्यक ऊर्जा पुरवते. तथापि, तुपाचे प्रमाण अत्यधिक असू नये, कारण ते जास्त कॅलरीज निर्माण करू शकते आणि शरीरात चरबी वाढवू शकते. त्यामुळे तूपाचे प्रमाण अधिक नसावे, असे तज्ज्ञ सांगतात. प्रमाण निश्चित करणे महत्वाचे आहे.


आंब्याचे भाव कमी होणार की वाढणार?
आंब्याच्या दरात वाढ किंवा घट हंगामाच्या परिस्थितीनुसार बदलते. यंदा हवामानामुळे आंब्याचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे काही आंब्यांचे दर वाढण्याची शक्यता आहे. तथापि, मागणी आणि वाहतूक खर्च यामुळे त्यात थोडे बदल होऊ शकतात. 


पावडरच्या आंब्यांपासून मुलांना दूर ठेवा
पावडरने पिकवलेले आंबे काही ठिकाणी विकले जातात; परंतु हे आंबे पचनासाठी योग्य नसतात. ते सामान्यतः रसायनांसह बनवले जातात, ज्यामुळे लहान मुलांसाठी हे हानिकारक ठरू शकते. पालकांनी असे आंबे न खाण्याचा निर्णय घ्यावा.


अक्षय तृतीयेला नैवेद्यात आमरसाचे महत्त्व
अक्षय तृतीयेच्या दिवशी घराघरांत आमरसाचा नैवेद्य केला जातो. अक्षय तृतीयेला आमरसाचे धार्मिक महत्त्व आहे. या दिवशी चवीला गोड असलेल्या आमरसाचा उपयोग शुभ समजला जातो. त्यात तूप घालणे हे पारंपरिक मानले जाते, कारण तुपामुळे आमरस चवदार होतो.


आंबा पिकणे म्हणजे मॅलिक अॅसिडचे शर्करेत रूपांतर
आंब्याचे पिकणे म्हणजे मॅलिक अॅसिडचे शर्करेत रूपांतर होणे, कच्च्या आंब्यात मॅलिक अॅसिड भरपूर असते, जे पिकल्यावर शर्करेत बदलते आणि आंबा गोड होतो.

Web Title: Is there any benefit or disadvantage to eating ghee with mango juice?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.