शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूनंतरही दिली जग पाहण्याची प्रेरणा

By admin | Updated: May 26, 2017 01:58 IST

नेत्रदानाने अंध व्यक्तीला जग पुन्हा पाहता येऊ शकते. या उदात्त हेतूने मृत्यूनंतर कुणाला जग पाहता यावे यासाठी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : नेत्रदानाने अंध व्यक्तीला जग पुन्हा पाहता येऊ शकते. या उदात्त हेतूने मृत्यूनंतर कुणाला जग पाहता यावे यासाठी नेत्रदान करण्याचा संकल्प लाला लजपतराय वॉर्डातील रहिवासी विश्वनाथ रामटेके यांनी केला होता. दरम्यान त्यांचे २३ मे रोजी निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार नेत्रदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्याने मृत्यूनंतरही दोन जणांना जग पाहता येणार आहे. समता नगर फेज वन येथील रहिवासी असलेले विश्वनाथ दासीकराम रामटेके हे जलसंपदा विभागात तांत्रिक कर्मचारी म्हणून कार्यरत होते. त्यांचे २३ मे रोजी सायंकाळी निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार नेत्रदानाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यात नागपूर येथील सूरज आय इन्स्टीट्युटने नेत्रदानाची प्रक्रिया पूर्ण केली. यावेळी डॉ.सोनल पराते, डॉ.गणेश आंबेकर यांची उपस्थिती होती. रामटेके यांच्या नेत्रदानामुळे समाजासमोर नेत्रदानाविषयी जागरुकता वाढेल यात शंका नाही. या संदर्भात नागरिकांनी पुढे येण्याची गरज आहे. नेत्रदानाच्या कार्यासाठी रामटेके कुटुंबातील सदस्यांनी मोलाची भूमिका बजावली. विशेष म्हणजे रामटेके यांच्या अंत्यविधीनंतर पार पाडला जाणारा धार्मिक विधी न करता त्याची रक्कम बौद्ध विहाराला दान केली जाणार आहे. यासाठी वैशाली रामटेके, रिषीन रामटेके, अश्विनी रामटेके, अस्मिता रामटेके, राजेश गजभिये, अजीत मेश्राम, प्रभाकर रामटेके यांच्यासह कुटुंबातील सदस्य प्रयत्नरत आहेत.