शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
2
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
5
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
6
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
7
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
8
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
9
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
10
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
11
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
12
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
13
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
14
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
15
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
16
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
17
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
18
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
19
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
20
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाईन गैरव्यवहाराची चौकशी सुरू

By admin | Updated: February 22, 2015 00:30 IST

पंचायत समिती साकोली अंतर्गत महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या शासकीय निधीची अफरातफर करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी सहायक कार्यक्रम अधिकारी यांना अटक केली...

साकोली : पंचायत समिती साकोली अंतर्गत महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या शासकीय निधीची अफरातफर करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी सहायक कार्यक्रम अधिकारी यांना अटक केली असून तत्कालीन आॅपरेटर अजुनही फरारच आहे. त्यामुळे या प्रकरणाचा खुलासा होऊ शकला नाही. पोलीस प्रशासन याची कसून चौकशी करीत आहे.प्राप्त माहितीनुसार, शासनाने महात्मा गांधी गॅरन्टी रोजगार हमी योजना अस्तीत्वात आणली. मजुरांना काम व वेळेवर मजुरी मिळावी यासाठी राज्यात या योजनेचे एकच खाते उघडले. याखात्यातून संबंधित अधिकाऱ्यांच्या डिजीटल सहीची सोय करून ही निधी सरळ ग्रामपंचायतीच्या खात्यावर हस्तांतरीत करण्याची सोय केली. याचा फायदा घेत या विभागातील कर्मचाऱ्यांनी संगनमत करून बनावट दस्तावेजाच्या आधारे आॅनलाईन घोटाडा करून ४९ लक्ष ५२ हजार ६३८ रूपयाचा अपहार केला. या प्ररकणाची तक्रार खंडविकास अधिकारी यांनी पोलिसात केली.यात सहायक कार्यक्रम अधिकारी अल्का लोथे, तत्कालीन आॅपरेटर प्रशांत उसगांवकर, राहुल राऊत, चेतन मडावी, विशाल केरझरे व महादेव उके यांचे नावे तक्रारीत आहे. ही रक्कम चार जणांच्या नावे बँक खात्यात जमा करून ती एटीएमच्या सहायाने काढण्यात आली. अशाप्रकारे हा घोटाळा करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी अल्का लोथे यांना अटक करून पोलीस कोठडी मिळविला असून प्रशांत उसगांवकर हा सध्या फरार आहे. तर ज्यांच्या नावे बँक खात्यात ही रक्कम वळविण्यात आली त्यांचेवर अजुनही कार्यवाही झाली नाही. (तालुका प्रतिनिधी )गैरव्यवहाराचा कालावधीपोलीस तपासात हा गैरव्यवहार मे २०१४ ते फेब्रुवारी २०१५ पर्यंतच्या कालावधीत हा गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले असून दोन तीन महिन्यापूर्वी प्रशांत उसगावकर याने ही नोकरी सोडली होती, असेही चौकशीदरम्यान उघड झाले आहे.डिजीटल स्वाक्षरीचा दुरूपयोगशासनाने हा निधी संबंधित ग्रामपंचायतच्या बँक खात्यावर हस्तातरीत करण्यासाठी खंडविकास अधिकारी व संबंधित अधिकारी यांच्या डीजीटल सहीचा उपयोग करावा लागतो. मग हा गैरव्यवहार करताना संबंधित खंडविकास अधिकारी यांनी डीजीटल सहीचा अधिकार कुणाला दिला. नियमाप्रमाणे असे अधिकार देता येतात का, याचीही चौकशी होणे गरजेची आहे.तपास गुन्हे शाखेकडे?पोलीस प्रशासनाच्या नियमाप्रमाणे पंचेवीस लक्ष रूपयापेक्षा अधिक शासकीय रकमेची अफरातफर असल्यास या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाकडे असतो. तक्रार होऊन चार दिवसाचा कालावधी लोटला असून या प्रकरणात स्थानिक पोलिसांना पुर्णपणे यश आले नाही.चौकशीकरिता समन्वय अधिकारी या प्रकरणाचा तपास अधिक सोपा व्हावा या विभागातील परीपूर्ण माहिती पोलिसांना अचुक मिळावी यासाठी मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी पोलिसांच्या मदतीकरीता पंचायत समिती साकोली येथील एका विस्तार अधिकाऱ्यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती केल्यामुळे या तपासाला गती येणार आहे.