शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्यांवर अन्याय

By admin | Updated: September 24, 2014 23:26 IST

अंशकालीन कर्मचारी संघटनेने शासनाशी वाटाघाटी करुन सन २००० पर्यंतच्या कर्मचा-यांना सरळ सेवेत सामावून घेण्याचे आश्वासन मिळविले. ही बाब अंशकालीन कर्मचा-यांवर अन्याय करणारी आहे.

करडी (पालोरा) : अंशकालीन कर्मचारी संघटनेने शासनाशी वाटाघाटी करुन सन २००० पर्यंतच्या कर्मचा-यांना सरळ सेवेत सामावून घेण्याचे आश्वासन मिळविले. ही बाब अंशकालीन कर्मचा-यांवर अन्याय करणारी आहे. सन २००३ पर्यंतच्या कर्मचा-यांचा त्यात विचार झालेला दिसत नाही. संघटनेने आपली पाठ थोपटून घेण्यात अर्थ नाही, असा नाराजीचा सूर अंशकालीन कर्मचा-यांत आहे.शासनासोबत लढाईत सर्वच अंशकालीन कर्मचारी उतरले होते. त्यात फक्त सन २००० पर्यंतचेच कर्मचारी संघर्षरत नव्हते. अंशकालीन कर्मचारी संघटना अशक्त ठरण्याच्या मार्गावर असतांना नव्यादमाच्या सहका-यांनी त्यात प्राण फुंकले. लढ्याला गती दिली. संघटनेचे विस्कळलेले कार्य रुळावर आणण्यास सन २००० नंतरच्या अंशकालीन बांधवांचा वाटा मोठा आहे. मात्र संघटना हे सर्व विसरुन निर्णय घेतांना दिसत आहे. वास्तविक पाहता सन २००० पर्यंतचे बहुतेक अंशकालीन सभासद ४६ वर्षाच्या पलिकडे गेले आहेत. वयोमर्यादा संपल्याने दु:खात आहेत. काहींना नोकरी तर काही व्यापारात - कामधंदयात गुंतले आहेत. बोटावर मोजण्यासारखे अंशकालीन या निर्णयाने लाभान्वीत होतील. या उलट सन २००३ पर्यंत कर्मचारी वयोमर्यादेत बसणारे आहेत. आजही नोकरिच्या प्रतिक्षेत आहेत. संघटनेने शासनाशी वाटाघाटी करतांनासर्व समावेशक निर्णय घ्यायला हवा होता. मात्र संघटनेने सर्वांच्या हिताचे निर्णय न घेता भेदभावाचे निर्णय घेतला आहे. संघटनेने आघात केला आहे. संघटनेने निर्णयाचा फेर विचार करावा,अशी मागणी सन २००३ पर्यंतच्या अंशकालीन बांधवाकडून होत आहे. (वार्ताहर)