शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

देशीदारु दुकानाला सील ठोकले

By admin | Updated: November 6, 2014 01:01 IST

नगर परिषदेने भाडेतत्वावर देशी दारु दुकान दिले होते. सदर दुकान रिकामे करण्याची विनंती केल्यावरही ती धूडकावून लावणाऱ्या दुकानाला शेवटी नगरपरिषदेने सील ठोकले.

तुमसर : नगर परिषदेने भाडेतत्वावर देशी दारु दुकान दिले होते. सदर दुकान रिकामे करण्याची विनंती केल्यावरही ती धूडकावून लावणाऱ्या दुकानाला शेवटी नगरपरिषदेने सील ठोकले.गोंदियाचे खेमचंद जेठानी यांनी सन २००१ मध्ये तीन वर्षाकरिता न.प. कडून भाडेतत्त्वावर पाच गाळे घेतले होते. परंतु त्यांनी हे गाळे देशी दारु परवाना असणाऱ्या नशिने यांना भाड्यो दिल्या होत्या. येथे नियमबाहयपणे राजरोसपणे हा सर्व व्यवहार सुरु होता. अनेकांनी हे दुकान बंद करण्याची मागणी नगरपरिषद प्रशासनाला केली होती. नगरपरिषदेने संबंधित दुकानदाराला गाळे रिकामे करण्याची अनेकदा विनंती केली, परंतु दुकानदाराने लक्ष दिले नाही. शेवटी ११ डिसेंबर २०१३ च्या आमसभेत सदर दुकान बंद करण्याचा ठराव घेण्यात आले. याबाबत नगर परिषदेने रितसर नोटीस संबंधित दुकानदाराला पाठविले होते. याकडे दुकानदाराने दुर्लक्ष केले.दुकानदाराने २ आॅगस्ट २०१४ ला यासंदर्भात न्यायालयात दाद मागितली. परंतु न्यायालयाने त्याचा अर्ज रद्द केला. नगर परिषदेने पुन्हा ७ आॅगस्टला दुकानदाराला नोटीस देवून गाळे रिकामे करण्यास सांगितले. संबंधित दुकानदाराने नगरपरिषदेच्या आदेशाला केराची टोपली दाखवून दुकान सुरुच ठेवले. दि. २८ सप्टेंबरला मुख्याधिकारी ए. आर. सातपुते, नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे, नगरसेवक आशिष कुकडे, नगरसेवक सलाम, श्याम धुर्वे, अ‍ॅड. विवेक स्वामी, संदीप पेठे, सचिन गायधने यांच्या समक्ष पाचही गाळ्यांना सील ठोकण्यात आले.संबंधित दुकानदाराने सात ते आठ वर्षापासून नगरपरिषदेला भाडे दिले नाही अशी माहिती असून याव्यतिरिक्त शहरात सुमारे २० ते २२ दुकानदारांनीही नगरपरिषदेला अनेक वर्षापासून भाडे दिले नाही. येथे नगरपरिषदेने कर्तव्याबरोबर कार्यक्षम प्रशासनाकडे लक्ष देण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)