शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

विषाणूजन्य आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 22:00 IST

गत चार, पाच दिवसांपासून कोसळणाºया पावसांच्या सरी, त्यात वाढलेल्या विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील विविध भागांत सर्दी, ताप, खोकल्यासह विषाणूजन्य आजारांचे रुग्ण बळावले आहे. अशक्तपणा वाढून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल होण्याची वेळ रुग्णांवर येत असल्याचे दिसत आहे. पावसात कोणी भिजत असल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता ते गांभीर्याने घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

ठळक मुद्देरुग्णालय, दवाखाने हाऊसफुल्ल : पावसाळ्यात खबरदारी घेण्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गत चार, पाच दिवसांपासून कोसळणाºया पावसांच्या सरी, त्यात वाढलेल्या विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील विविध भागांत सर्दी, ताप, खोकल्यासह विषाणूजन्य आजारांचे रुग्ण बळावले आहे. अशक्तपणा वाढून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल होण्याची वेळ रुग्णांवर येत असल्याचे दिसत आहे. पावसात कोणी भिजत असल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता ते गांभीर्याने घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.भंडारा जिल्ह्यात जून महिन्यात पावसाने दडी मारली होती. जुलैमध्ये पहिल्या आठवड्यापासून दमदार पावसाने हजेरी लावली. अधून-मधून कोसळणाºया पावसांच्या सरींमुळे अनेकांची त्रेधातिरपीट उडत होती. त्यामुळे पावसात अनेकदा भिजावे लागत असल्याने त्यामुळे विषाणूंचा संसर्ग होत आहे.'गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यासह शहरात पावसाच्या सरी कोसळत आहे. पावसात भिजल्याने अनेकांना सर्दी झाली आहे. त्यामुळे ताप, खोकलादेखील येऊ लागला आहे. त्याशिवाय उलट्या, जुलाब होत आहेत. विषाणूजन्य ताप असल्याने तो आठ दिवस राहतो. तापामुळे डिहायड्रेशन होऊन अशक्तपणा वाढत आहे.सर्दी, खोकला तसेच तापाची ही लक्षणे लहान मुलांमध्ये अधिक दिसून येत आहेत. कफ वाढल्याने दम्याच्या रुग्णांना त्रास होत आहे. रुग्णाला चक्कर येणे, सांधे दुखणे ही नवी लक्षणे दिसून येत आहेत. सध्याचे हवामान खराब आहे. विषाणूंचे हवेतील प्रमाण वाढत आहे. पावसात भिजल्याने आजार वाढण्याची शक्यता असते. पावसात डोके भिजल्याने डोकेदुखी, सर्दी, त्याशिवाय हात पाय दुखायला सुरुवात होते. शहरासह जिल्ह्यातील अनेक दवाखान्यात रुग्णसंख्या वाढत असल्याने रुग्णालयात गर्दी होत आहे.पावसाळ्यात विषाणुजन्य आजार, डेंग्यू, मलेरिया, दुषित पाणी व अन्नाद्वारे होणारे आजार जसे टायफाईड, कावीळ, जुलाब आदी बळावण्याची शक्यता जास्त असते. त्यात लहान बालकांची रोगप्रतिकारक क्षमता कमी असल्याने आजार सहज होऊ शकतात. यासाठी पुर्ण बाह्याची कापडे घालणे, डास व इतर किटकांपासून बचावासाठी मच्छरदानीचा वापर करणे, परिसरात पाणी जमा होवू न देणे, अन्नपदार्थ झाकुन ठेवणे तसेच उघड्यावरील खाद्यान्नाचे सेवन टाळणे, उकळुन थंड केलेले पाणी प्यायला देणे. प्रतिबंध उपचारापेक्षा चांगला आहे. बाळांना वेळोवेळी रोगप्रतिबंधक लसी लावुन घेणे. रुग्णांनी तज्ज्ञ डॉक्टरांकडून औषधोपचार करावा.-डॉ. यशवंत लांजेवार,बालरोग तज्ज्ञ, सिटीकेअर मल्टीस्पेशिआलिटी हॉस्पिटल, भंडारा.