शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय अविष्कार अभियानाचे उद्घाटन

By admin | Updated: August 27, 2016 00:25 IST

राष्ट्रीय अविष्कार अभियानाचे स्थानिक जे.एम. पटेल महाविद्यालय, भंडारा येथे उद्घाटन करताना विज्ञान आणि गणित शिक्षक समन्वयकांचे एक दिवसीय उद्बोधन कार्यक्रम घेण्यात आला.

भंडारा : राष्ट्रीय अविष्कार अभियानाचे स्थानिक जे.एम. पटेल महाविद्यालय, भंडारा येथे उद्घाटन करताना विज्ञान आणि गणित शिक्षक समन्वयकांचे एक दिवसीय उद्बोधन कार्यक्रम घेण्यात आला. विविध महाविद्यालयातील समन्वयक या कार्यक्रमात सहभागी झाले होते. याप्रसंगी अभियानांतर्गत विविध कृती कार्यक्रम सुरू करण्यात आले. मानव संसाधन विकास मंत्रालयाने राष्ट्रीय अविस्कार अभियानाची सुरूवात केली आहे. ज्याचा उद्देष शाळा आधारित ज्ञानाला शाळाबाह्य जीवनाशी जोडणे आणि विविध आनंददायी आणि अर्थपूर्ण कृती कार्यक्रमाद्वारे विज्ञान आणि गणित शिकणे आहे. ६ ते १८ वयोगटातील मुलांना हेरून आणि त्यांच्या बुद्धीमत्तेचा विकास करण्यासाठी त्यांच्यात जिज्ञासू वृत्ती आणि शोध वृत्तीला प्रोत्साहन देणे यावर हे अभियान सेवा पुरवित आहे.या अभियानांतर्गत विविध कृती कार्यक्रम करण्यासाठी एक मार्गदर्शन संस्था म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर यांनी जे.एम. पटेल महाविद्यालय भंडारा यांची निवड केली आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ. देवानंद शहारे यांनी भूषविले, तर डॉ. जयमुर्ती चावला आणि प्रा. एस.एस. चनखोरे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास ढोमणे यांनी तरूण वयात संशोधन नवनिर्मितीची जाणिव विकसित आणि बळकट करण्यात मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या प्रयत्नांची स्तुती केली. त्यांनी या अभियानासाठी महाविद्यालयाची मार्गदर्शक संस्था म्हणून निवड केल्याबद्दल रातुम नागपूर विद्यापीठाचे आभार व्यक्त केले.अभियानाचे समन्वयक प्रा. अनिल नवलाखे आणि सहसमन्वयक प्रा. गिरधारीलाल तिवारी यांनी पावर पार्इंट प्रस्तुतीकरणाच्या माध्यमातून राष्ट्रीय अविष्कार अभियानाचे तपशिल स्पष्ट केले. याप्रसंगी आपले मत व्यक्त करताना डॉ. जयमुर्ती चावला यांनी अशा प्रयत्नाची गरज व्यक्त केली. डॉ. देवानंद शहारे यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा प्रदान केल्या. या कार्यक्रमासाठी प्रा. यशपाल राठोड यांनी प्रयत्न केले. डॉ. पद्मावती राव यांनी संचालन केले तर डॉ. विणा महाजन यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)