शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
8
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
9
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
10
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
11
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
12
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
13
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
14
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
15
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
16
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
17
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
18
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
19
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
20
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल

मोफत दळण हवंय तर.. कर पूर्णपणे भरा; भंडारा  जिल्ह्यातील अभिनव प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 1:46 PM

Bhandara News करमुक्त असणाऱ्या कुटुंबाला दळणासाठी वर्षभर एकही रुपया खर्च करावा लागणार नाही, असा अभिनव प्रयोग ग्रामपंचायत, हरदोली झंझाड येथील प्रशासनाने हाती घेतला आहे.

ठळक मुद्दे हरदोली ग्रामपंचायतीच्या सभेत ठराव

लोकमत न्यूज नेटवर्क   

भंडारा : करमुक्त असणाऱ्या कुटुंबाला दळणासाठी वर्षभर एकही रुपया खर्च करावा लागणार नाही, असा अभिनव प्रयोग ग्रामपंचायत, हरदोली झंझाड येथील प्रशासनाने हाती घेतला आहे, असा उपक्रम राबविणारी जिल्ह्यातील पहिलीच ग्रामपंचायत आहे.

कराच्या भांडवलावर ग्रामपंचायत गावाचा विकास करीत असते. ग्रामीण जनता मात्र इमारत कर, पाणीपट्टी कर, दिवाबत्ती कर, स्वच्छता कर, सामान्य आरोग्य आदी कर भरण्यास बेफिकिरी दाखवतात. काम अडलं तरच कर भरले जातात, हे वास्तव आहे. त्यामुळे गावाच्या विकासात खोडा, विघ्न येत असतात.

गावाची सुधारणा, प्रगती व्हावी, तसेच नियमित कर भरण्याची सवय गावकऱ्यांना लागावी, यासाठी करमुक्त झालेल्या कुटुंबियांना वर्षभर गहू, तांदूळ डाळ आदींचे दळण ग्रामपंचायतीच्या निधीतून मोफत करण्यात येणार आहे. तसा ठराव २८ डिसेंबरच्या ग्रामपंचायतीने मासिक सभेत एकमताने पारित केला आहे. मोफत दळण योजनेत सहभागी होण्यासाठी ग्रामपंचायतीने शर्थी लागू केल्या आहेत. १४ लाख ३४ हजार ७६२ रुपयांची मागणी आहे. दहा लाख ७१ हजार ४२० रुपयांची थकबाकी आहे. ग्रामपंचायतीने आतापर्यंत केवळ चार लाख ८३ हजार ९५१ रुपयांची कर वसुली झाली आहे. त्यामुळे कर भरा, दळण मोफत करा, ही योजना सुरू केली आहे.

३१ मार्चपर्यंत कर भरणाऱ्यांना या योजनेत सहभागी होता येणार आहे. करदाते २०२१-२२ या वित्तीय वर्षात एप्रिल अखेरपर्यंत पूर्ण कर भरतील, त्यांना वर्षभर दळण मोफत करून मिळणार आहे. यासाठी करदात्यांना ओळखपत्र दिले जाणार आहे. त्यात कुटुंबातील सदस्यांची नावे राहणार आहेत.

करदात्यांना कर भरण्याची प्रेरणा मिळेल व गावाची प्रगती होण्यास भांडवल हातात येणार आहे. हरदोली ग्रामपंचायत विविध उपक्रमातून गावाला प्रगतीची दिशा देत आहे. त्यामुळेच या गावाला स्मार्ट गावचा यावर्षीचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.

हरदोली ग्रामपंचायतअंतर्गत ६३२ करदाते आहेत. त्यापैकी आतापर्यंत केवळ १४० करदात्यांनी कर भरला आहे. वर्षभर दळण मोफत ही योजना सुरू झाल्यानंतर कर भरण्यास वेग आला आहे.

गावात थकीत करांचा आकडा वाढत आहे. त्याचा परिणाम गाव विकासावर होत आहे. कर बुडवेगिरीला लगाम लावला जावा. करदात्यांना करप्रणालीमध्ये नियमित करावे. ग्रामपंचायतीचे आर्थिक उत्पन्न वाढावे, यासाठी हा नवीन प्रयोग राबवला जात आहे.

सदाशिव ढेंगे

सरपंच, ग्रामपंचायत हरदोली / झंझाड

टॅग्स :Socialसामाजिक