लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : रेती चोरी आणि बळजोरी या सुत्राचा अवलंब करुन सुकळी दे. येथील वैनगंगा नदी पात्रातून रेतीची अवैध खनन सुरु आहे. येथील घाटावर १०० ते २०० मीटरपर्यंत रेतीचे ढीग सर्वत्र दिसत आहे. लिलाव झालेल्या घाटासारखेच येथे रात्रंदिवस रेतीचा उपसा सुरु असून यंत्राने ट्रकमध्ये रेती भरली जात आहे. महसूल प्रशासनाच्या आशीर्वादाने सदर गोरखधंदा येथे सुरु आहे.सुकळी दे. गावाजवळून वैनगंगा नदी वाहते. गावापासून नदीचे अंतर दीड ते दोन किमी. आहे. सदर घाटाचे लिलाव झाला नाही. परंतु राजरोसपणे रेतीचे अवैध उत्खनन येथे सुरु आहे. जिकडे नजर फिरविली तिकडे रेतीचे ढीग येथे पहायला मिळतात. रस्त्याच्या शेजारीही रेतीचे ढीग येथे पाडले आहेत. सुमारे २०० ते ३०० मीटर अंतरापर्यंत रेतीचा साठा येथे आहे.रेतीची टिप्परद्वारे वाहतूक सुरुच आहे. तालुका मुख्यालयापासून सदर घाट केवळ आठ ते नऊ किमी अंतरावर आहे, परंतु महसूल प्रशासन येथे मूग गिळून गप्प आहे. शासनाच्या दररोज येथे महसूल बुडत आहे. चोवीस तासात येथून ४० ते ५० ट्रक रेती वाहतूक केली जाते. मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टरच्या येथे उपयोग केला जातो. संघटीत रेती तस्करीचे जाळे येथे पसरले आहे.घाटाची लावली वाटरेती तस्करांनी सुकळी दे. नदीघाटाची तस्करांनी वाट लावली आहे. दर्जेदार व दाणेदार पांढरी शुभ्र रेतीची सर्रास लुट सुरु असतांना जिल्हा स्तरावरील महसूल अधिकाऱ्यांचेही येथे दुर्लक्ष दिसत आहे. अद्याप पावेतो येथे मोठी कारवाई झाली नाही. राजकीय दबाव की अर्थकारण येथे दडले आहे. हे अद्याप गुलदस्त्यात आहे. महसूल विभाग आणि पोलिसांच्या आशीर्वादाने जिल्हाभर रेतीची तस्करी सुरू असून वरिष्ठ अधिकारी मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहेत.तर केली जाते कारवाईमहसूल प्रशासन येथे कर्तव्य म्हणून कारवाई करीत रेती जप्ती करते. त्यानंतर शासकीय कंत्राटदाराला ब्रासच्या भावाने रेती विक्री केली जतो. पुन्हा रेती तस्कर रेती चोरीला सुरुवात करतात, असे चक्र येथे सतत सुरु आहे.शेतीचे नुकसाननदी काठाजवळ गाळाची शेती आहे. धुळीमुळे शेती नापिकी झाली आहे. रेती तस्करांची येथे मुजोरी वाढली आहे. स्थानिकांनी अनेकदा प्रशासनास तक्रार केली. परंतु कारवाई येथे होत नाही. रेती तस्करांची भीती येथे असल्याने थेट त्यांचेशी मुजोरी करु शकत नाही. केवळ उघड्या डोळ्याने येथे पाहणे तेवढे शिल्लक आहे.
सुकळीत शेकडो ब्रास रेतीसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 05:00 IST
रेती तस्करांनी सुकळी दे. नदीघाटाची तस्करांनी वाट लावली आहे. दर्जेदार व दाणेदार पांढरी शुभ्र रेतीची सर्रास लुट सुरु असतांना जिल्हा स्तरावरील महसूल अधिकाऱ्यांचेही येथे दुर्लक्ष दिसत आहे. अद्याप पावेतो येथे मोठी कारवाई झाली नाही. राजकीय दबाव की अर्थकारण येथे दडले आहे. हे अद्याप गुलदस्त्यात आहे. महसूल विभाग आणि पोलिसांच्या आशीर्वादाने जिल्हाभर रेतीची तस्करी सुरू असून वरिष्ठ अधिकारी मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहेत.
सुकळीत शेकडो ब्रास रेतीसाठा
ठळक मुद्देरात्रंदिवस खनन : दररोज भरते रेती उपसासाठी वाहनधारकांची यात्रा