लाखोरी येथील दवाखाना कुलूप बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2019 06:00 AM2019-12-09T06:00:00+5:302019-12-09T06:00:24+5:30

कावळे यांची बदली झाल्यापासून रुग्णालयास कुलूप लावलेला आहे. त्याचप्रमाणे येथील परिचारिका अश्विनी बांते यांची बदली मोहदुरा येथे करण्यात आली. एएनएम काचन चौधरी व परिचर जयदेव ढोके यांची बदली सालेभाटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आली आहे. यामुळे लाखोरी, आलेसुर, मासलमेटा, खेडेपार, बोरगाव आदी गावातील दहा हजार लोकांना आरोग्य सेवेचा लाभ घेता येत नाही.

Hospital lock at Lakhori closed | लाखोरी येथील दवाखाना कुलूप बंद

लाखोरी येथील दवाखाना कुलूप बंद

Next
ठळक मुद्देउपकेंद्रही रिकामे : चार महिन्यांपासून आरोग्यसेवा कोलमडली

चंदन मोटघरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : तालुक्यातील लाखोरी येथील शासकीय आयुर्वेदिक दवाखाना मागील चार महिन्यापासून बंद अवस्थेत आहे. तसेच उपकेंद्र बंद असल्याने सर्वसामान्य रुग्ण तसेच प्रसुतीची सुविधा नसल्याने महिला रूग्णांचे हाल होत आहे. वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांचे स्थानांतरण झाल्यामुळे लाखोरी येथील आरोग्यसेवा कोलमडली आहे.
लाखोरी आयुर्वेदिक दवाखान्याचे वैद्यकिय अधिकारी जयंत कावळे यांची बदली बेटाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आली आहे. कावळे यांची बदली झाल्यापासून रुग्णालयास कुलूप लावलेला आहे. त्याचप्रमाणे येथील परिचारिका अश्विनी बांते यांची बदली मोहदुरा येथे करण्यात आली. एएनएम काचन चौधरी व परिचर जयदेव ढोके यांची बदली सालेभाटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आली आहे. यामुळे लाखोरी, आलेसुर, मासलमेटा, खेडेपार, बोरगाव आदी गावातील दहा हजार लोकांना आरोग्य सेवेचा लाभ घेता येत नाही. प्राथमिक आरोग्य केंद्र व आयुर्वेदिक दवाखाने येथील डॉक्टरांच्या अभावामुळे लाखनीतील ग्रामीण रुग्णालयावर बोझा पडतो आहे. आरोग्य उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांच्या बदलीमुळे गरीब व गरजु रुग्णांचे तसेच गरोदर व स्तनदा माताचे हाल होत आहेत. गावातील अप्रशिक्षीत व बोगस पदव्या असलेल्या डॉक्टरांकडे रुग्णांना धाव घ्यावी लागत आहे. रुग्णांच्या खासगी डॉक्टरांकडून आर्थिक लुट होत असते व औषधोपचारही योग्य होत नाही.

लाखोरीचे डॉक्टर चांदेवार सेवानिवृत्त झाल्यानंतर शासनाने जागा भरलेली नाही. डेप्युटेशनवर कावळे यांना पाठविण्यात आले होते. त्यांना परत बोलविण्यात आले आहे. त्यामुळे डॉक्टरांची कमतरता आहे. नवीन जागा भरण्यात येणार आहे. उपकेंद्राचे कर्मचारी कार्यरत आहेत.
- डॉ. सुनील हटनागर, तालुका वैद्यकिय अधिकारी लाखनी
शासनाकडे वैद्यकिय अधिकाऱ्यांची पद भरण्याची मागणी केली आहे. सालेभाटा, लाखोरी, राजेगाव येथे डॉक्टरांची पद रिक्त आहे. सदर प्रश्नावर जिल्हाधिकारी व आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे.
- ज्ञानेश्वर रहांगडाले, जि.प. सदस्य लाखोरी क्षेत्र

Web Title: Hospital lock at Lakhori closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.