शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वाआयुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

उच्च न्यायालयाने बजाविली जिल्हा निवड समितीला नोटीस

By admin | Updated: November 17, 2014 22:46 IST

अंशकालीन निदेशकांची कायम स्वरूपाची पदे निर्माण करण्याबाबत उच्च न्यायालयाने आदेश दिले आहे. असे असतानाही यापूर्वी अंशकालीन निदेशक म्हणून काम केलेल्यांना ‘त्या’ पदावर सामावून न

१ डिसेंबरला होणार सुनावणी : प्रकरण कंत्राटी अंशकालीन निदेशक भरतीचेतुमसर : अंशकालीन निदेशकांची कायम स्वरूपाची पदे निर्माण करण्याबाबत उच्च न्यायालयाने आदेश दिले आहे. असे असतानाही यापूर्वी अंशकालीन निदेशक म्हणून काम केलेल्यांना ‘त्या’ पदावर सामावून न घेता भंडारा जिल्हा परिषदेने कंत्राटी तत्वावर अंशकालीन निदेशकांची भरती प्रक्रीया राबविली आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने जिल्हा निवड समितीला नोटीस बजावली आहे. याबाबत १ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे.बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क या कायद्यांतर्गत बालकांचा सर्वांगिण विकास व्हावा, यासाठी कला निदेशक, खेळ व आरोग्यनिदेशक, कार्यशिक्षण निदेशक ही पदे निर्माण केली आहेत. या पदावर २०११-१२ या सत्रात १० महिन्यांच्या करारावर ७५ तासिकेप्रमाणे अंशकालीन निदेशकांची नियुक्ती प्रत्येक जिल्हा परिषदेअंतर्गत शाळा समितीमार्फत केली होती. पुढील सत्रात कायम न केल्यामुळे उच्च न्यायालयात काही अंशकालीन निदेशकांनी धाव घेतली. न्यायालयाने या पदासंदर्भात धोरण ठरवून निदेशकांची कायम स्वरूपी पदे निर्माण करण्याबाबत शासनाला स्पष्ट निर्देश दिले आहे. दि. २१ आॅगस्ट २०१४ रोजी शासन निर्णयाने केवळ १०० विद्यार्थी संख्या असलेल्या शाळेत निदेशकांच्या नियुक्तीची तरतूद करून राज्यात एक हजार ८३५ शाळेत पाच हजार ५०५ अंशकालीन निदेशकांच्या पदास जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली गठीत पाच सदस्यीय जिल्हा निवड समितीमार्फत प्रत्येक जिल्ह्यात कंत्राटी पद्धतीने भरण्यास मान्यता दिली. त्या अनुषंगाने भंडारा जिल्ह्यात कंत्राटी पद्धतीने ३३ अंशकालीन निदेशकांची पदे भरण्याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या कंत्राटी भरती प्रक्रियेला तसेच या पदांवर आक्षेप घेण्यासाठी सतीश पटले, प्रमोद मस्के, मनोहर गौपाले, मुकेश जांगळे, प्यारेलाल वाघमारे, रविंद्र मोहतुरे, रविंद्र अंबुले, अजय पालवे, विलास भिवगडे, लीला झलके, सुजाता भुरे अशा २६ अंशकालीन निदेशकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात याचिका (क्रमांक ५९५८) दाखल केली.या प्रकरणी न्यायमूर्ती वासंती नाईक व न्यायमूर्ती सी.व्ही. भडंगे यांच्या खंडपिठाने अंशकालीन निदेशकांची याचिका विचारात घेवून राज्याच्या शिक्षण विभाग तथा भंडारा जिल्हा निवड समितीला नोटीस बजावली आहे. त्यामुळे हे प्रकरण न्यायालयाच्या आदेशांतर्गत कोणते वळण घेते, याकडे अंशकालिन कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)