शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

निराधार वृद्ध दाम्पत्यास लाखनीच्या युवकांकडून मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 05:00 IST

काही वर्षांपूर्वी त्यांचा एकुलता एक मुलगा मृत्युमुखी पडला; परंतु जिद्दीच्या जोरावर स्वतःचं घर नसतानी झरपसारख्या लहानशा खेड्यात गावाबाहेर असलेल्या हाथठेल्यात लीलाबाई आणि विमान या वृद्ध दाम्पत्यांनी चपला शिवण्याचा व्यवसाय करून संसार जोडता केला. राहण्यासाठी साधे घरे बांधणे शक्य नसल्याने आता मुलाच्या माघारी एका हाथठेल्याच्या आश्रयाने त्यांना राहावे लागत आहे. हाथठेला असुरक्षित आहे.

चंदन मोटघरेलोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : भगवंत कोणत्या ना कोणत्या रूपात तो सतत मदतीसाठी उभा असतो. तो आज उभा ठाकला डॉ. चंद्रकांत निंबार्ते अन् सुनील लुटे यांच्या रूपाने. राहायला हक्काचे घर नसलेल्या व आयुष्याच्या सायंकाळी हाथठेल्यात आपला संसार थाटणाऱ्या एका वृद्ध दाम्पत्याला भेट देऊन मदत केली. याबाबत लोकमतने वृध्द दाम्पत्याची करूण कहाणी प्रकाशित केली होती. याची दखल समर्थ विद्यालयाच्या १९९१ बॅचच्या विद्यार्थ्यांनी  घेतली आहे.    लाखनी तालुक्यातील झरप येथील कुंभरे वृद्ध  दाम्पत्याची ही व्यथा कानी पडताच लाखनीचे समाजसेवी डॉ. चंद्रकांत निंबार्ते अन् घोडेझरीचे पोलीस पाटील सुनील लुटे यांची पावले वृद्ध दाम्पत्याकडे चालू लागली. एकुलता एक कमावता मुलगा मृत्युमुखी पडल्यानंतर आयुष्याचा सायंकाळचा आधार हिरावल्यानंतर चपला दुरुस्तीचा धंदा गावोगावी करून उदरनिर्वाह करणाऱ्या या वृद्ध दाम्पत्याच्या हाथठेल्याकडे डॉक्टर आणि पोलीस पाटलांची पावले चालू लागली. त्यांची आस्थेने विचारपूस करून त्यांच्या खांद्यावर हाथ ठेवून मायेचा ओलावा दिला.  डॉक्टर चंद्रकांत निंबार्ते व सुनील लुटे या समाजसेवकांनी कुंभरे वृद्ध  दाम्पत्यांना पाच हजार रुपयांचा किराणा, दोन ब्लँकेट व साडी-धोतर देऊन मदत केली. यावेळेस समर्थ विद्यालयाचे माजी विद्यार्थी मुबारक सय्यद, डॉ. गिरिजा शंकर लांजेवार, डॉ. गणेश मोटघरे, श्रीधर काकीरवार उपस्थित होते. विमान भिवा कुंभरे व लीलाबाई विमान कुंभरे हे वृद्ध जोडपे मूळचे झरपचे. घरकुलासाठी प्रशासनाचे उंबरठे झिजवूनही घरकुल मिळाले नाही. त्यामुळे विमान भिवा कुंभरे आणि लीलाबाई विमान कुंभरे हे वृद्ध दाम्पत्य लाखनी तालुक्यातील झरप येथे गावाबाहेर असलेल्या एका लाकडी हाथठेल्यात  गेल्या कित्येक वर्षांपासून आपला संसार थाटून राहत आहेत. त्यांचा मूळ व्यवसाय म्हणजे चपला दुरुस्तीचा, त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. काही वर्षांपूर्वी त्यांचा एकुलता एक मुलगा मृत्युमुखी पडला; परंतु जिद्दीच्या जोरावर स्वतःचं घर नसतानी झरपसारख्या लहानशा खेड्यात गावाबाहेर असलेल्या हाथठेल्यात लीलाबाई आणि विमान या वृद्ध दाम्पत्यांनी चपला शिवण्याचा व्यवसाय करून संसार जोडता केला. राहण्यासाठी साधे घरे बांधणे शक्य नसल्याने आता मुलाच्या माघारी एका हाथठेल्याच्या आश्रयाने त्यांना राहावे लागत आहे. हाथठेला असुरक्षित आहे.

३० वर्षांपासून जगण्याचा संघर्ष- कुंभरे दाम्पत्याचा ३० वर्षांपासून जगण्याचा संघर्ष सुरू आहे. आता शरीर साथ देत नाही. वयाची सात दशके उलटली आहेत. कोरोनामुळे कामही नाही. अशा परिस्थितीत उपासमार होते. कधीकाळी घोडेझरीला गेलो तर पोलीस पाटील सुनील लुटे हक्काने जेवायला देतात आणि लीलाबाईंसाठी जेवण बांधून देतात. थोडीबहुत जगण्याची आशा जिवंत आहे. डॉ. निंबार्ते आणि सुनील लुटे यांनी मदतीचा हात देण्याची ग्वाही दिली असून, घरकुलाचे स्वप्न पूर्ण होऊन हक्काचे घर आणि निराधार योजनेचा लाभ मिळवून दिला तर हा माझ्या जगण्याचा संघर्ष सार्थकी लागेल, असे या वृद्ध दाम्पत्यांनी सांगितले. 

 

टॅग्स :jobनोकरीcorona virusकोरोना वायरस बातम्या