जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 05:00 AM2020-08-10T05:00:00+5:302020-08-10T05:01:10+5:30

लाखनी तालुक्यातही दमदार पावसामुळे नदीनाले ओसंडून वाहत आहेत. हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला असून बळीराजा रोवणीच्या कामाला गुंतला आहे. पालांदूर परिसरातही दमदार पावसाने हजेरी लावल्याने धान पिकासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. पालांदूर व परिसरात झड सदृष्य स्थिती अनुभवायला मिळत आहे. पालांदूर मंडळ कृषी कार्यालयांतर्गत ५२ गाव शिवारातील रोवणी अंतीम टप्याकडे आहे.

Heavy rains all over the district | जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस

जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस

Next
ठळक मुद्देरोवणी अंतिम टप्यात : साकोलीत अतिवृष्टी, चांदोरी पुलावर चढले पाणी

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : चातकासारखी वाट पाहत असलेला बळीराजा दोन दिवसाचा संततधार पावसाने सुखावला आहे. शनिवार रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली असून रविवारीही दिवसभर पाऊस बरसला. विशेष म्हणजे साकोली तालुक्यात अतिवृष्टी झाली असून साकोली - तुमसर राज्य मार्गावर असलेल्या चांदोरी पुलावर पाणी आल्याने दोन तास वाहतूक ठप्प झाली होती.
पंधरवाड्यापासून पाऊस केव्हा बरसणार याच्या प्रतीक्षेत असलेला बळीराजा सुखावला आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील सातही तालुक्यात रखडलेल्या रोवणीच्या कामाला अंतीम रुप मिळाले आहे. पावसाअभावी काही ठिकाणी पºहे वाळत होती. मात्र या पावसामुळे पºह्यांना जीवनदान मिळाले आहे.
तुमसर तालुक्यात झारली येथे संततधार पावसामुळे घराची भिंत कोसळली. सुदैवाने यात पती-पत्नी थोडक्यात बचावले. ही घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली. त्यांच्या निवासाची सोय अंगणवाडी केंद्रात करण्यात आली आहे. घटनास्थळी सरंपच नमिता रहांगडाले, देवचंद ठाकरे, भवानी रहांगडाले, देवीलाल पटले आदींनी भेट दिली. तहसीलदारांना घटनेची माहिती देण्यात आली. तुमसर तालुक्यातही मुसळधार पावसाने हजेरी लावली.
साकोली शहरासह तालुक्यात शनिवार रात्रीपासूनच मुसळधार पाऊस बरसला. या पावसाने जनजीवन प्रभावित झाले आहे. गत २४ तासात तालुक्यात ७७ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. उड्डाणपूलाचे काम सुरु असून महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या नाल्यांची स्वच्छता न केल्यामुळे महामार्गावर पाणी साचले. नागझीरा मार्गावरही दोन फुट पाणी आल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला.
लाखनी तालुक्यातही दमदार पावसामुळे नदीनाले ओसंडून वाहत आहेत. हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला असून बळीराजा रोवणीच्या कामाला गुंतला आहे. पालांदूर परिसरातही दमदार पावसाने हजेरी लावल्याने धान पिकासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. पालांदूर व परिसरात झड सदृष्य स्थिती अनुभवायला मिळत आहे. पालांदूर मंडळ कृषी कार्यालयांतर्गत ५२ गाव शिवारातील रोवणी अंतीम टप्याकडे आहे. खताची मात्रा देण्याकरिता पाण्याची टंचाई निर्माण झाली होती. मात्र या पावसाने उणीव भरुन काढली आहे.
याशिवाय लाखांदूर, पवनी, मोहाडी तालुक्यातही पावसाने हजेरी लावली असून शेतीच्या कामाला प्रारंभ झाला आहे. रविवार सकाळी ८.३० वाजेपर्यंत २४ तासात सरासरी ९.८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. मात्र त्यानंतर जिल्ह्यात दमदार पाऊस बरसल्याची माहिती आहे.

गोसेखुर्द धरणाचे ११ दरवाजे उघडले.
जिल्ह्याच्या सीमावर्ती भागासह मध्यप्रदेशात पाऊस बरसल्याने वैनगंगा धोक्याच्या पातळीवर वाहत आहे. परिणामी गोसेखुर्द धरणाच्या ३३ वक्रद्वारांपैकी ११ वक्रद्वार अर्ध्या मीटरने उघडण्यात आली आहेत. गत दोन दिवस पावसाचा अंदाजही वेधशाळेने वर्तविला आहे.

Web Title: Heavy rains all over the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.