शहरं
Join us  
Trending Stories
1
बिटींग रिट्रीट सेरेमनी आजपासून सुरु होणार; पण भारत ना हस्तांदोलन करणार, ना गेट उघडणार...
2
छगन भुजबळ मंत्रिमंडळात परतताच मनोज जरांगे संतापले; अजित पवारांना दिला सूचक इशारा
3
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
4
“एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री, जनता अशीच भरडली जाणार, असा काय नाईलाज आहे”
5
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
6
Corona Virus : कोरोना रिटर्न्स! JN.1 व्हेरिएंटचा कहर; 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध, 'या' लोकांना सर्वाधिक धोका
7
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमावरून अक्षय कुमार आणि विकी कौशलमध्ये भांडणं?
8
ट्रम्प यांचा सल्ला कुक यांनी धुडकावला! अ‍ॅपलचा भारतावरच विश्वास; इतक्या कोटींची केली गुंतवणूक
9
शेख हसीना यांच्याविरूद्ध बांगलादेश सरकारची नवी खेळी! आधी पक्षावर बंदी, त्यातच आता...
10
कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय! महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर, देशांत सर्वाधिक रुग्णसंख्या कुठे?
11
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
12
लग्नानंतर ६ महिन्यांतील फक्त २१ दिवस एकत्र होते विरुष्का, अनुष्काचा खुलासा, म्हणाली...
13
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
14
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
15
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
16
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
17
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
18
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
19
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
20
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार

सफाई कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य व रोगनिदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 21:38 IST

नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र नगर परिषद भंडारा येथे सफाई कर्मचारी यांचा आरोग्य तपासणी व रोगनिदान शिबिर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

ठळक मुद्देनगरपरिषद भंडाराचा उपक्रम : नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राकरिता पालिकेचा प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र नगर परिषद भंडारा येथे सफाई कर्मचारी यांचा आरोग्य तपासणी व रोगनिदान शिबिर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाला नगराध्यक्ष सुनील मेंढे, जिल्हाधिकारी शंतनु गोयल, उपाध्यक्ष आशिष गोंडाणे, जिल्हा शल्य चिकित्सक माधुरी थोरात, आरोग्य सभापती नितीन धकाते, मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे, महिला बाल कल्याण सभापती गीता सुरेश सिडाम, सभापती शमीमा शेख, सभापती कैलास तांडेकर, नगरसेविका मधुरा मदनकर, आशाताई उईके, नगरसेवक कवलजितसिंग चड्ढा मंगेश वंजारी, दिनेश भुरे, रजनीश मिश्रा, अमर उजवणे, अजीज शेख तसेच सफाई कर्मचारी, महिला स्वयं सहाय्य बचत गटातील सदस्य व नागरिक उपस्थित होते.मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे यांनी प्रास्ताविक मध्ये सफाई कर्मचारी हे शहर स्वच्छ ठेवण्याकरिता महत्वाची भूमिका बजावत आहेत. त्यांना सफाई करीत असतांना विविध आजार होण्याची शक्यता जास्त असते. त्यांना आरोग्याची काळजी करिता आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.जिल्हाधिकारी यांनी सफाई कर्मचारी स्वच्छतेचे कामे वर्षभर करीत असून त्यांच्यामुळेच नागरिकांना आरोग्याची सुरक्षा प्रदान करीत असतात. कर्मचाºयांची वर्षातून तपासणी होण्याबाबत, तसेच तपासणी करण्यात आलेल्याची नोंदी फाईल करून रुग्णांना पुढील उपचारा करिता योग्य राहील. वैद्यकीय अधिकारी टीम कडून तपासणी करून रोग निदान करिता पुढील उपचार जिल्हा रुग्णालयातून करून घेण्याबाबत सांगितले.जिल्हा शल्य चिकित्सक थोरात यांनी आयोजित आरोग्य तपासणी व रोगनिदान शिबीर मध्ये आरोग्य तपासणी, मौखिक तपासणी, व्यसनावर मार्गदर्शन, शुगर, मधुमेहाची तपासणी इत्यादी बद्दल आढळल्यास रोग निदान उपचाराकरिता शासकीय रुग्णालयात उपचार करू शकता.याशिवाय मधुमेह उपचाराकरिता साखर, मीठ, मैदा, डालडा-घी, व भात अश्या ५ गोष्टीवर नियंत्रण करण्याचे सांगितले. नितीन धकाते यांनी सफाई कर्मचारी करिता आरोग्य शिबिराचे आयोजन पहिल्यांदा आयोजन करण्यात आले असून कर्मचाºयांचे आरोग्याची काळजीबाबत सूचना देऊन आरोग्य तपासणी करून घ्यावी असेही त्यांनी सांगितले.वैद्यकीय अधिकारी डॉ.कुंभारे यांनी गोवर, रुबेला रोगावर नियंत्रण करण्याबाबत तसेच २७ नोव्हेंबर पासून शाळा, अंगणवाडी, प्राथमिक केंद्र मध्ये मोहीम राबविण्यात येणार आहे. गोवर व रुबेला रोगाबद्दल ची होण्याची लक्षणे व उपचार यावर मार्गदर्शन केले. उपाध्यक्ष आशु गोंडाणे यांनी सफाई कर्मचारी हे महत्वपूर्ण घटक असून पूर्ण शहराची स्वच्छता करत असतात. त्यामुळे त्यांच्याकरिता आरोग्य तपासणी कार्यक्रम आयोजित केलेला असून सर्व कर्मचारी यांनी त्यांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. नगराध्यक्ष सुनील मेंढे यांनी जिल्हा रुग्णालय भंडारा येथील वैद्यकीय अधिकारी व त्यांची टीम यांच्या माध्यमातून सफाई कर्मचारी यांच्या करिता आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. नगर परिषद नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र करिता प्रस्तावित ८० लाख रुपयांची इमारत मंजूर असून निधी मंजुरीकरिता पालकमंत्री यांचे सोबत चर्चा झाली असल्याचे सांगितले.आरोग्याची काळजी व जागृती, तपासणी बाबत सफाई कामगार व कर्मचारी यांचे आरोग्याची काळजी म्हणून शिबिराचे आयोजन केले आहे. सफाई कर्मचाऱ्यांचे दररोजचे काम महत्वाचे असून व त्यांचे माधमातून शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यास मदत होत असते. सर्व कर्मचाऱ्यांनी नियमित आरोग्य तपासणी करावे असे आवाहन केले. सदर शिबीर नगराध्यक्ष सुनील मेंढे यांच्या संकल्पनेतून साकार झाले असून कर्मचारी आरोग्य तपासणी शिबीर नगर परिषद अंतर्गत प्रथमच घेण्यात आलेले आहे.सूत्र संचालन व आभार प्रदर्शन प्रवीण पडोळे यांनी केले. कार्यक्रमाकरिता आरोग्य निरीक्षक, दिनेश भवसागर, मुकेश शेंद्रे, बांते, सफाई मोहरील यांनी प्रयत्न केले. सदर कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात सफाई कर्मचारी, स्वयं सहायता बचत गटातील सदस्य उपस्थित होते.