शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
3
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
4
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
5
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
6
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
7
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
8
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
9
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
10
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
11
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
12
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
13
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
14
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
15
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
16
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
17
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
18
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
19
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

‘तो’ मातीला देतोय देवत्त्वाचा आकार

By admin | Updated: September 3, 2016 00:23 IST

एखाद्याच्या हातात जन्मजात एखादी कला अवगत असते. त्या कलेला गरज असते संधीची.

मूर्र्तींच्या किमती वाढल्या : बाप्पांचे आगमण होणार धडाक्यातइंद्रपाल कटकवार भंडाराएखाद्याच्या हातात जन्मजात एखादी कला अवगत असते. त्या कलेला गरज असते संधीची. अशीच संधी सन १९१० मध्ये तुळशीराम रुद्राक्षवार यांना मिळाली. देवतांच्या मूर्ती बनविण्याची कला त्यांच्या हातात होती. मातीपासून विविध कलात्मक वस्तूंची निर्मिती ते सहज करीत. याबाबत त्यांच्या परंपरागत वारसा अविरतपणे जोपासणारे त्यांचे नातू व मूर्तिकार सुरेश माधवराव रुद्राक्षवार यांनी या कलेबाबत अनेक रहस्य उलगडले.भगवंताने ज्या मातीत मनुष्याला जन्म दिला त्या मातीतून भगवंतांची प्रतिमा साकारण्याचे अहोभाग्य कलावंत कुटुंबियाला लाभले. गांधी चौक परिसरात छोट्याशा जागेत रुद्राक्षवार कुटुंबिय १०$४ वर्षांपासून देवतांच्या मूर्ती बनविण्याचा वारसा अखंडपणे जोपासत आहे. याबाबत जाणून घेण्यासाठी त्यांच्या घरी भेट दिली असता सुरेश म्हणाले, आजोबांपासून मिळालेला हा वारसा आधी वडिलांनी व नंतर आम्ही दोघे भावंड जोपासत आहोत. वडीलांकडून मातीला कलात्मक आकार देण्याचे धडे गिरविले. लहानपणापासून मातीची प्रचंड ओढ असल्यामुळे पारंपरिक कला शिकायला फार वेळ लागला नाही.कुंभार समाज दारिद्र्यातकुंभार समाज दारिद्र्याच्या खाईत आहे. काबाळकष्ट करुनही मातीला भाव मिळत नाही. हाती कला असूनही त्याचा योग्य मोबदला मिळत नसल्याची खंत मूर्तीकार सुरेश रुद्राक्षवार यांनी व्यक्त केली. स्वातंत्र्य प्राप्तीच्या ७० वर्षानंतरही कुंभार समाज दारिद्र्यात जीवन जगत आहे़ त्यांची शासनाने किंवा लोकप्रतिनिधींनी गंभीरतेने दखल घेतलेली नाही़ उच्च शिक्षण कधी मिळालेच नाही़ संधी उपलब्ध झाल्यास आर्थिक टंचाईच्या फटक्यामुळे या समाजाला माघारी यावे लागले़ शासनाने आतातरी लक्ष द्यावे, अशी आस आहे़ मातीची रॉयल्टी उपलब्ध करून द्यावी, मूर्तीकारांना बीपीएल श्रेणीच्या सुविधा द्यावी, मानधन मिळावे अशी मागणीही त्यांनी केली आहे.