‘तो’ मातीला देतोय देवत्त्वाचा आकार

By Admin | Updated: September 3, 2016 00:23 IST2016-09-03T00:23:58+5:302016-09-03T00:23:58+5:30

एखाद्याच्या हातात जन्मजात एखादी कला अवगत असते. त्या कलेला गरज असते संधीची.

'He' gives Mother the size of the Godhead | ‘तो’ मातीला देतोय देवत्त्वाचा आकार

‘तो’ मातीला देतोय देवत्त्वाचा आकार

मूर्र्तींच्या किमती वाढल्या : बाप्पांचे आगमण होणार धडाक्यात
इंद्रपाल कटकवार भंडारा
एखाद्याच्या हातात जन्मजात एखादी कला अवगत असते. त्या कलेला गरज असते संधीची. अशीच संधी सन १९१० मध्ये तुळशीराम रुद्राक्षवार यांना मिळाली. देवतांच्या मूर्ती बनविण्याची कला त्यांच्या हातात होती. मातीपासून विविध कलात्मक वस्तूंची निर्मिती ते सहज करीत. याबाबत त्यांच्या परंपरागत वारसा अविरतपणे जोपासणारे त्यांचे नातू व मूर्तिकार सुरेश माधवराव रुद्राक्षवार यांनी या कलेबाबत अनेक रहस्य उलगडले.
भगवंताने ज्या मातीत मनुष्याला जन्म दिला त्या मातीतून भगवंतांची प्रतिमा साकारण्याचे अहोभाग्य कलावंत कुटुंबियाला लाभले. गांधी चौक परिसरात छोट्याशा जागेत रुद्राक्षवार कुटुंबिय १०$४ वर्षांपासून देवतांच्या मूर्ती बनविण्याचा वारसा अखंडपणे जोपासत आहे. याबाबत जाणून घेण्यासाठी त्यांच्या घरी भेट दिली असता सुरेश म्हणाले, आजोबांपासून मिळालेला हा वारसा आधी वडिलांनी व नंतर आम्ही दोघे भावंड जोपासत आहोत. वडीलांकडून मातीला कलात्मक आकार देण्याचे धडे गिरविले. लहानपणापासून मातीची प्रचंड ओढ असल्यामुळे पारंपरिक कला शिकायला फार वेळ लागला नाही.

कुंभार समाज दारिद्र्यात
कुंभार समाज दारिद्र्याच्या खाईत आहे. काबाळकष्ट करुनही मातीला भाव मिळत नाही. हाती कला असूनही त्याचा योग्य मोबदला मिळत नसल्याची खंत मूर्तीकार सुरेश रुद्राक्षवार यांनी व्यक्त केली. स्वातंत्र्य प्राप्तीच्या ७० वर्षानंतरही कुंभार समाज दारिद्र्यात जीवन जगत आहे़ त्यांची शासनाने किंवा लोकप्रतिनिधींनी गंभीरतेने दखल घेतलेली नाही़ उच्च शिक्षण कधी मिळालेच नाही़ संधी उपलब्ध झाल्यास आर्थिक टंचाईच्या फटक्यामुळे या समाजाला माघारी यावे लागले़ शासनाने आतातरी लक्ष द्यावे, अशी आस आहे़ मातीची रॉयल्टी उपलब्ध करून द्यावी, मूर्तीकारांना बीपीएल श्रेणीच्या सुविधा द्यावी, मानधन मिळावे अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Web Title: 'He' gives Mother the size of the Godhead