शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
4
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
5
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
6
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
7
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
8
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
9
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
10
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
11
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
12
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
13
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
14
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
15
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
16
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
17
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
18
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
19
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
20
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल

चार वर्षांत घरकुल मिळाले नाही, आता अंगणात पाय ठेवू देणार नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2022 22:01 IST

भाऊ; निवडणुकीत खर्च करण्यासाठी पैसे नाहीत, घरी लागणारी कागदपत्रे नाहीत, नवऱ्याची परवानगी नाही, तिकडच्या गटातून लढणार आहे, सासू-सासरे नाही म्हणतात, अशी नानाविध कारणे सांगितली जात आहेत. उमेदवार सापडेनासे झाल्याने गट प्रमुखांबरोबर समर्थकांचाही पारा वाढत चालला आहे. मी खर्च करणार नाही, तुम्हांलाच करावा लागणार, अशा अटीही काही संभाव्य उमेदवारांकडून ठेवल्या जात आहेत.

युवराज गोमासेलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : प्रधानमंत्री आवास योजनेत नाव असूनही अतिक्रमित जागेच्या कारणावरून घरकुलापासून वंचित ठेवले. चार वर्षे अनेकदा विनवण्या केल्या. मतदानावर बहिष्कार टाकला, अधिकाऱ्यांना निवेदन दिली. त्यावेळी अपमानित केले. परंतु गाव नमुना आठवरील अतिक्रमणाची नोंद हटविली नाही. एकाही गावात असा अन्याय झालेला नाही. आता निवडणुका आहेत, त्यांना व त्यांच्या समर्थकांना घराच्या अंगणातही पाय ठेवू देणार नाही, असा इशारावजा आक्रोश ग्रामीण मतदारांत दिसून येत आहे. लोकांची कामे करणाऱ्यांना निवडून देऊ, असे रोखठोकपणे सांगितले जात आहे. जिल्ह्यात ३६३ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक आचारसंहिता लागू करण्यात आली असून प्रशासकराज सुरू आहे. लवकरच उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. त्यामुळे गावागावांत ग्रामपंचायत निवडणुकांचे वारे जोमात आहेत. उमेदवार निवडीसाठी गट प्रमुखांनी मोर्चेबांधणी केली असून सामाजिक, कौटुंबिक व जातीय समीकरणावर आधारित जनाधार असलेल्या उमेदवाराचा शोध घेतला जात आहे. अनेक गटांचे वाॅर्डावाॅर्डातील उमेदवार ठरले असले तरी राखीव जागांवरील उमेदवार शोधताना गट प्रमुखांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. भाऊ; निवडणुकीत खर्च करण्यासाठी पैसे नाहीत, घरी लागणारी कागदपत्रे नाहीत, नवऱ्याची परवानगी नाही, तिकडच्या गटातून लढणार आहे, सासू-सासरे नाही म्हणतात, अशी नानाविध कारणे सांगितली जात आहेत. उमेदवार सापडेनासे झाल्याने गट प्रमुखांबरोबर समर्थकांचाही पारा वाढत चालला आहे. मी खर्च करणार नाही, तुम्हांलाच करावा लागणार, अशा अटीही काही संभाव्य उमेदवारांकडून ठेवल्या जात आहेत. उमेदवारांच्या शोधासाठी गावप्रमुखांनी अनेक कार्यकर्त्यांना कामाला लावले आहे. मात्र संभाव्य उमेदवार भाव खात असल्याने हिरमोड होत आहे. 

सरपंच पदासाठी गटागटात संघर्षयंदा थेट लोकांमधून सरपंचाची निवड होणार आहे. त्यामुळे सरपंचपदासाठी गटागटांत संघर्षाचे वातावरण आहे. काहींनी वेगळा गट तयार करून निवडणूक लढण्याचे संकेत दिल्याने त्रिकोणी व चौकाेनी लढाई होणार आहे. त्यातही काही वाॅर्डात जाऊ विरूद्ध जाऊ तर भावाविरूद्ध भाऊ, मित्राविरूद्ध मित्र, असे चित्र दिसणार आहे. काहींनी गावात सरपंच आपल्याच मर्जीतील असावा, यासाठी उमेदवार मिळत नसल्याचे समर्थकांना सांगून इनीलाच मैदानात उतरविण्याचा पराक्रम इवायाकडून होत आहे.

तरुणांसोबत ज्येष्ठ पुढारीही मैदानात- अनेक निवडणुकांत माझी शेवटची निवडणूक असल्याचे सांगणारे ज्येष्ठ पुढारीही गटातील तरुण उमेदवारांची संधी नाकारून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. पटाचा बैल कधी म्हातारा होत नाही, अशी पुष्टीही त्यासाठी जोडली जात आहे.

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक