शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

संगमबेटावर हातभट्टी दारू कारखाना उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2024 05:00 IST

जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत संगम बेटावर अवैध दारू गाळली जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे जयवंत चव्हाण यांना मिळाली. त्यांनी नवनियुक्त पोलीस उपनिरीक्षक रवींद्र रेवतकर यांच्यावर धाड टाकण्याची जबाबदारी सोपविली. मात्र, या बेटावर जाण्यासाठी पट्टीचे पोहणारे कर्मचारी हवे होते. पोलीस नायक सतीश देशमुख हे नदीच्या किनाऱ्यावर ठेवलेली नाव आणण्यासाठी पोहत गेले आणि त्या नावेत बसून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संगम बेटावर धाड मारली.

ठळक मुद्देएलसीबीची कारवाई : ९०० लिटर दारूसह मोहामाच जप्त, सहा लाखांचा मुद्देमाल

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : निर्जन आणि चोहोबाजूने पाण्याने वेढलेल्या संगम बेटावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून हातभट्टी दारू कारखाना बुधवारी उद्ध्वस्त केला. ९०० लिटर हातभट्टी दारूसह १०० किलो मोहामाच, २२७ प्लास्टिक व मातीचे मडके असा ६ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली. जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत संगम बेटावर अवैध दारू गाळली जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे जयवंत चव्हाण यांना मिळाली. त्यांनी नवनियुक्त पोलीस उपनिरीक्षक रवींद्र रेवतकर यांच्यावर धाड टाकण्याची जबाबदारी सोपविली. मात्र, या बेटावर जाण्यासाठी पट्टीचे पोहणारे कर्मचारी हवे होते. पोलीस नायक सतीश देशमुख हे नदीच्या किनाऱ्यावर ठेवलेली नाव आणण्यासाठी पोहत गेले आणि त्या नावेत बसून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संगम बेटावर धाड मारली. तेथील दृष्य पाहून पथक अचंबित झाले. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गावठी दारू गाळत असल्याचे दिसून आले. २२७ प्लास्टिक व मातीच्या मडक्यात १०० किलो सडवा मोहामाच, ९०० लिटर हातभट्टीची दारू आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. यावेळी जितेंद्र रणभीड मेश्राम (वय ३७, रा.संगम पुनर्वसन) याला अटक करण्यात आली. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण, उपनिरीक्षक रवींद्र रेवतकर, धर्मेंद्र बोरकर, सतीश देशमुख, राजू दोनोडे, प्रशांत कुरंजेकर, सचिन देशमुख यांनी केली. पोलिसांच्या या कारवाईने जिल्ह्यातील दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.  

धाड टाकण्यासाठी पोलीस गेले वैनगंगा पोहून भंडारा तालुक्यातील संगमबेटावर बुधवारी पोलिसांनी अवैध दारू कारखाना उद्ध्वस्त केला. मात्र, या बेटावर पोहोचणे पोलिसांसाठी मोठे दिव्य होते. निर्जन असे हे बेट चारही बाजूने पाण्याने वेढलेले आहे. तेथे पोहोचण्यासाठी बोटीशिवाय किंवा पट्टीच्या पोहणाऱ्याशिवाय पर्याय नाही. पोलिसांकडे कोणतीही बोट नव्हती. मात्र, पैलतिरावर एक बोट दिसताच पोलीस नायक सतीश देशमुख पोहून गेले आणि त्यांनी नाव आणून इतर पोलिसांना संगम बेटावर पोहोचविले. ही धाडसी कारवाई करणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी कौतुक केले.

 

टॅग्स :liquor banदारूबंदी