शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

न्यायदूत उपक्रमातून न्याय हक्काबद्दल मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 21:49 IST

न्याय हक्कापासून वंचित राहिलेल्या समाजाच्या विविध घटकांना मुख्य प्रवाहात आणून अशा व्यक्तींपर्यत स्वत: पोहचून न्याय हक्काबद्दल मार्गदर्शन करणे व न्याय मिळवून देण्यासाठी हायकोर्ट बार असोशिएशन न्यायदूतच्या माध्यमातून प्रत्यक्ष नागरिकांपर्यंत पोहचणार आहेत. सामाजिक, आर्थिक, शैक्षणिकदृष्ट्या वंचित असलेल्या व्यक्तींसाठी नऊ डिसेंबर रोजी कवडसीसह इतर १० गावांमध्ये न्यायदूत उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देन्याय आपल्या दारी : ९ डिसेंबरला कवडसी येथे जिल्हास्तरीय शुभारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : न्याय हक्कापासून वंचित राहिलेल्या समाजाच्या विविध घटकांना मुख्य प्रवाहात आणून अशा व्यक्तींपर्यत स्वत: पोहचून न्याय हक्काबद्दल मार्गदर्शन करणे व न्याय मिळवून देण्यासाठी हायकोर्ट बार असोशिएशन न्यायदूतच्या माध्यमातून प्रत्यक्ष नागरिकांपर्यंत पोहचणार आहेत. सामाजिक, आर्थिक, शैक्षणिकदृष्ट्या वंचित असलेल्या व्यक्तींसाठी नऊ डिसेंबर रोजी कवडसीसह इतर १० गावांमध्ये न्यायदूत उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमात हायकोर्ट बार असोशिएशनच्या माध्यमातून विविध समस्यांचे व प्रश्नांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. भंडारा तालुक्यातील कवडसी येथे होणाऱ्या कार्यक्रमात शासनाच्या विविध विभागाचे स्टॉल लागणार असून या ठिकाणी शासकीय योजनांची माहिती देण्यात येणार आहे.९ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता कवडसी येथे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमुर्ती व्ही. एम. देशपांडे यांच्या हस्ते न्यायदूत उपक्रमाचे उदघाटन होणार आहे. प्रधान जिल्हा व सत्र न्यायधिश संजय देशमुख प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहतील. गणेशपूर, कोरंबी, पिंडकेपार, बेला, दवडीपार, सालेबर्डी, कवडसी, पेवठा, लोहारा, चिचोली व पिपरी या भंडारा तालुक्यातील ११ गावातील ग्रामपंचायत कार्यालयात ९ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते २ यावेळेत वकीलांची चमु नागरिकांच्या समस्या व प्रश्न जाणून घेवून मार्गदर्शन करणार आहे.शासनाच्या विविध योजनांची जनतेला माहिती उपलब्ध करुन देणे व योजनांचा लाभ पात्र व्यक्तींना मिळवून देणे. आवश्यकता भासल्यास वरील समस्या सोडविण्यासाठी उच्च न्यायालायात जनहित याचिका दाखल करणे हा न्यायदूत उपक्रमाचा उद्देश आहे. या उपक्रमाचा लाभ गोरगरीब व वंचित नागरिकांना व्हावा यासाठी हा उपक्रम भंडारा तालुक्यातील ११ गावात आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एम.ए. कोठारी, अ‍ॅड. अनिल किलोर, अ‍ॅड. कैलास भूरे, अ‍ॅड. विजय मोरांडे, अ‍ॅड. अतुल पांडे, अ‍ॅड. जयंत बिसेन व अ‍ॅड. प्रफ्फूल खुबाळकर यांनी केले आहे. २