शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान कंपन्यांना दिलासा, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; एटीएफवरील व्हॅट १८% वरून थेट ७% वर!
2
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चेनंतरच आनंद परांजपेंचा पक्षप्रवेश; उदय सामंत यांचे स्पष्टीकरण
3
Top Marathi News LIVE Updates: अंबरनाथमध्ये मुख्य जलवाहिनीला मोठी गळती; लादी नाका परिसरात लाखो लीटर पाणी वाया
4
भारतीय जहाज दुर्घटनेनंतर जयशंकर यांचा परराष्ट्र मंत्र्यांशी थेट संवाद; दिला महत्त्वाचा सल्ला
5
मुलांच्या भविष्याची चिंता मिटली! 'PPF'च्या माध्यमातून शिक्षण आणि लग्नासाठी उभा करू शकता लाखोंचा फंड; जाणून घ्या नियम
6
भारताच्या शेजारील देशात नेमकी काय परिस्थिती? पेट्रोल-डिझेलचे दर पाहून चक्रावून जाल...
7
मोबाईल देणं पडलं महागात! अल्पवयीन मुलाने आईच्या खात्यातून शेजाऱ्याला पाठवले ३३ लाख अन् पुढे जे झालं.. 
8
IPL 2026 Playoffs Race : RCB सह GT चं तिकीट 'कन्फर्म'; उर्वरित २ जागांसाठी ६ संघांमध्ये चुरस
9
इराणची ‘मच्छर सेना’ अमेरिकेला ठरतेय भारी! का आहे इतकी खास?
10
NEET परीक्षेत मोठा बदल, पुढच्या वर्षापासून...; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र यांची मोठी घोषणा!
11
चमत्कारिक प्रसूती! महिलेनं ५ दिवसांच्या अंतरानं दिला ४ बाळांना जन्म, आईसह मुलेही सुखरूप
12
प्रेमासाठी लेकीनेच केला घात; प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी कोट्यधीश बापाच्या घरातच मुलीने टाकला दरोडा
13
महाराष्ट्रात सुरू होणार एसआयआर, मतदारांना काय करावं लागेल? जाणून घ्या!
14
हडपसर बॉम्ब प्रकरणात मोठी कारवाई; नागपूर रेल्वे स्टेशनवरून संशयित ताब्यात; आणखी किती जण रडारवर?
15
पहिले 'महामंदी' आता आणखी एक मोठा इशारा! रॉबर्ट कियोसाकी म्हणाले, "महागाई आणि कर्ज तुमची संपत्ती..."
16
युवराज सिंगच्या वडीलांविरोधात गुन्हा दाखल; महिलांबद्दल आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचा आरोप!
17
Unnao Rape Case : कुलदीप सेंगरला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का! उच्च न्यायालयाचा 'तो' निर्णय रद्द; अडचणीत वाढ
18
मोहन जोशींनी स्वामींची भूमिका करण्यास दिलेला नकार; प्रवीण तरडेंचा खुलासा, म्हणाले- "त्यांना चालता-बोलता येत नव्हतं..."
19
स्वप्नपूर्ती! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने मुंबईत घेतलं हक्काचं घर, शेअर केले सुंदर फोटो; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

गवराळावासीयांनी दिली रंगाला तिलांजली'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 05:00 IST

गावात किसनबाबा अवसरे महाराज यांचे वास्तव्य होते. ते मुळचे चंद्रपूर जिल्ह्यातील बेलगाव येथील रहिवासी होते. ते व्यवसायाने गवंडी होते. ते गवराळा येथील हनुमान मंदिरात राहत असत. त्यांनी श्रमदानातून या परिसरातील अनेक गावांमध्ये मंदिराचे बांधकाम केले. त्यांचा मितभाषी, मनमिळावू स्वभाव आणि धार्मीक वृत्तीमुळे ते परिसरात सुप्रसिद्ध होते.

ठळक मुद्दे२८ वर्षापासून परंपरा कायम : लाकडांऐवजी केरकचऱ्याची करतात होळी

हरिश्चंद्र कोरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
विरली बु.: होळीनंतरचे धुलीवंदन म्हणजे विविध रंगाची उधळण करीत बेधूंद होऊन नाचण्याची आनंददायी पर्वणी. या सणाला संपूर्ण देशात सर्व आबालवृद्ध देहभान विसरुन विविध रंगांनी न्हाऊन निघतात. मात्र लाखांदूर तालुक्यातील गवराळा येथील गावकऱ्यांनी गेल्या २८ वर्षापासून धुलीवंदनाला रंग न खेळण्याची परंपरा जोपासली आहे.
या गावात किसनबाबा अवसरे महाराज यांचे वास्तव्य होते. ते मुळचे चंद्रपूर जिल्ह्यातील बेलगाव येथील रहिवासी होते. ते व्यवसायाने गवंडी होते. ते गवराळा येथील हनुमान मंदिरात राहत असत. त्यांनी श्रमदानातून या परिसरातील अनेक गावांमध्ये मंदिराचे बांधकाम केले. त्यांचा मितभाषी, मनमिळावू स्वभाव आणि धार्मीक वृत्तीमुळे ते परिसरात सुप्रसिद्ध होते. अशा या श्रम प्रतिष्ठेला चालना देणाऱ्या कर्मयोगी किसनबाबांचे १९ मार्च १९९२ रोजी निधन झाले. आपल्या जीवनयात्रेच्या अंतिम दिवशीही त्यांनी मंदिराचे अपूर्ण बांधकाम पूर्ण केले. तो दिवस होळीचा होता. संपूर्ण परिसर शोकसागरात बुडाला. त्यावेळी शोकमग्न गवराळावासीयांनी होळी साजरी न करण्याचा संकल्प केला आणि तो संकल्प अद्याप अबाधित आहे. होळीच्या दिवशी सर्वत्र विविध रंगाची उधळण करीत आचकट विचकट मौजमजा केली जाते. मात्र गवराळा येथे कर्मयोगी किसनबाबा अवसरे महाराज यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्रिदिवसीय पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन केले जाते. धुलीवंदनाच्या दिवशी गोपालकाल्याने या महोत्सवाचा समारोप होतो. या कार्यक्रमात गावातील सर्व जातीधर्माचे लोक मोठ्या भक्तीभावाने सहभागी होतात. अशाप्रकारे येथील ग्रामवासी रासायनिक अथवा नैसर्गिक रंगांएवजी भक्तीरसात न्हाऊन निघतात. पुण्यतिथी महोत्सवात विविध धार्मिक जनजागृतीपर कार्यक्रम, सामूदायीक ध्यान, सामूदायीक प्रार्थना, कीर्तन, भारूड, भजन, दिंडी आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्याचप्रमाणे संपूर्ण ग्रामसफाई करून जमा झालेल्या केरकचºयाची प्रतिकात्मक होळी पेटविली जाते. धुलीवंदनाच्या दिवशी ग्रामगीता तत्वज्ञान, ग्रामसभा, ग्रामस्वराज्य आदी विषयांवर विविध मान्यवर मार्गदर्शन करतात. हा कार्यक्रम ग्रामगीताचार्य तुकारामदादा यांचे उत्तराधिकारी लक्ष्मणदादा नारखेडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि संतांच्या सहवासात दरवर्षी साजरा केला जातो.

आदर्श परंपरा जोपासण्याची गरज
राज्यात सर्व होळी व धुळवड मोठ्या उत्साहात साजरी करुन लाकूड जाळले जाते. त्यामुळे प्रदूषण होते. रंगातही लाखो रुपये खर्च होतात. निष्पाप प्राण्यांचे बळी घेतले जातात. त्यामुळे पर्यावरणची हानी होते. गवराळावासीयांनी या सर्व प्रकारांना तिलांजली देऊन आपला एक वेगळा आदर्श समाजापुढे ठेवला आहे. या गवराळावासीयांचा आदर्श व परंपरा इतर गावकºयांनी जोपासण्याची गरज आहे.

टॅग्स :Socialसामाजिक