शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

थकबाकीमुळे ग्रामपंचायत अडचणीत

By admin | Updated: September 16, 2014 23:31 IST

करडी ग्रामपंचायत थकीत करधारकांमुळे आर्थिक संकटात सापडली आहे. ग्रामपंचायतीचे विविध खर्च भागविण्यासाठी पेच निर्माण झाला आहे. ग्रामपंचायतीची एकूण मागणी ९,८१,९९० रुपये असताना सप्टेंबरपर्यंत

युवराज गोमासे - करडी (पालोरा)करडी ग्रामपंचायत थकीत करधारकांमुळे आर्थिक संकटात सापडली आहे. ग्रामपंचायतीचे विविध खर्च भागविण्यासाठी पेच निर्माण झाला आहे. ग्रामपंचायतीची एकूण मागणी ९,८१,९९० रुपये असताना सप्टेंबरपर्यंत फक्त ७६,५३० रुपयांची कराची वसुली झाली आहे. खर्च वजा जाता ग्रामपंचायतीकडे पैसेच शिल्लक नाहीत. दिवाळी समोर असताना वीज बिल, कर्मचारी वेतन, दैनंदिन खर्च, इतर देणे आदी खर्चासाठी अडचणी आहेत. आर्थिक डबघाईच्या मार्गावर असलेल्या ग्रामपंचायतीने वसुलीसाठी कठोर निर्णय घेण्याची गरज आहे. करडी हे परिसरातील सर्वात मोठे गाव आहे. गावाची लोकसंख्या सहा हजाराचे घरात असून मध्यवर्ती व्यापाराचे केंद्र म्हणूनही मोहाडी तालुक्यात गावाची ओळख आहे. व्यापारी प्रतिष्ठान असलेल्या गावाची ग्रामपंचायत सध्या मात्र आर्थिक तंगीत सापडली असून विविध कठीनाईचा सामना करीत आहे. नागरिकांवर मोठ्या प्रमाणात करांची रक्कम थकीत आहे. मागील थकबाकी, चालू मागणी आणि झालेली वसुली यात कमालीची तफावत आहे. एकूण कर मागणीच्या ७ टक्के रक्कम कराच्या कपात गोळा झाली तर ९३ टक्के रक्कम थकीत आहे. ग्रामपंचायतीचे उत्पन्नाचे स्त्रोत म्हणून कर रुपाने जमा होणाऱ्या निधीकडे पाहिले जाते. मात्र हे स्त्रोतच आटल्याने ग्रामपंचायतीवर देणदारांची रक्कम थकीत झाली आहे. दिवाळीचा सण समोर असतांना गावात पथदिवे व साफसफाई, पाण्यात ब्लिचींग पावडर, विज बिल, कर्मचाऱ्यांचे वेतन, दैनंदिन प्रशासकिय खर्चासाठी प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.करडी ग्रामपंचायतीची सन २०१४-१५ या आर्थिक वर्षातील विविध करांची थकीत व चालू मागणी रक्कम याप्रमाणे आहे. ग्रामपंचायतीची सामान्य कर व पाणी कर मिळून सर्व मार्गाची एकूण कर मागणी ९,८१,९९० रुपयांची आहे. ग्रामपंचायतीला एकुण कर मागणीच्या रक्कमेपैकी वसुली सामान्य कर ५०,६०५ रुपये, सर्व पाणी करांची वसुली २५,९२५ रुपये, एकुण ७६,५३० रुपयांची वसुली सप्टेंबर २०१४ पर्यंत झाली आहे. ग्रामपंचायतीला एकुण कर मागणीच्या ७ टक्के रक्कमेची वसुली प्राप्त झाली आहे. एकुण कर वसुलीमध्ये १३ ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या रक्कमेचा सर्वाधिक वाटा आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या ग्रामपंचायतीला कर वसुलीसाठी सक्तीची व जप्तीची कारवाई करण्याशिवाय तरणोपाय दिसत नाही.