आरक्षणाला पुन्हा दहा वर्ष मुदत वाढ देण्यासाठी शासन प्रयत्नरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 06:00 AM2020-01-24T06:00:00+5:302020-01-24T06:01:09+5:30

लाखांदूर तालुक्यातील पिंपळगाव (कोहळी) येथे आयोजित विविध विकासकामांचा भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमात विविध संघटनांच्या वतीने विधानसभा अध्यक्ष नाना पटोले आणि जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. नाना पटोले म्हणाले, वनजमीन, अतिक्रमित जमीन धारकांना त्यांच्या पट्ट्यासाठी लवकरच बैठक घेऊन सर्व प्रकरणांचा निपटारा करावयाचा आहे.

The government is trying to extend the reservation by ten years | आरक्षणाला पुन्हा दहा वर्ष मुदत वाढ देण्यासाठी शासन प्रयत्नरत

आरक्षणाला पुन्हा दहा वर्ष मुदत वाढ देण्यासाठी शासन प्रयत्नरत

Next
ठळक मुद्देनाना पटोले : पिंपळगाव येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : आगामी विशेष अधिवेशनात आरक्षणात पुन्हा दहा वर्ष वाढ देण्यासाठी शासन प्रयत्नरत आहे. या आरक्षणाचा सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक लाभ लोकसंख्येच्या प्रमाणात मिळण्यासाठी जनगणनेत ओबीसीचा उल्लेख व्हावा, असे प्रतिपादन विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले.
लाखांदूर तालुक्यातील पिंपळगाव (कोहळी) येथे आयोजित विविध विकासकामांचा भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमात विविध संघटनांच्या वतीने विधानसभा अध्यक्ष नाना पटोले आणि जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे यांचा नागरी सत्कार करण्यात आला.
नाना पटोले म्हणाले, वनजमीन, अतिक्रमित जमीन धारकांना त्यांच्या पट्ट्यासाठी लवकरच बैठक घेऊन सर्व प्रकरणांचा निपटारा करावयाचा आहे. अनेक बेरोजगारांच्या हाताला काम द्यायचे आहे. धान खरेदी केंद्र हे शेतकऱ्यांसाठी आहे. गावात सेवा सहकारी संस्था आहे. त्यांच्या माध्यमातून धान खरेदी करता येईल काय आणि त्याची तातडीने मोजणी करुन लवकरात लवकर चुकारे अदा करण्याचा प्रयत्न केला जाईल. बचत गटांना विविध उपक्रम देण्यात येतील. आपल्या गावाचा विकास कसा करता येईल. याविषयीच्या सुचना नवीन पिढीकडून अपेक्षित आहे. त्यातूनच आपली प्रगती होईल. गरीबी दूर करता येईल. पिक विम्याचे पैसे मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशिल असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा परिषद क्षेत्र पिंपळगाव अंतर्गत दहेगाव, पिंपळगाव, घाट किन्हाळ, चिचगाव, इंदोरा, सोनी आदी ठिकाणी १७ विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, सभापती मंगला बगमारे, जिल्हा परिषद सदस्य मनोहर राऊत, सरपंच शालु गहाणे, रामचंद्र परशुरामकर, तहसीलदार महल्ले, अभियंता मटाले उपस्थित होते. कार्यक्रमासाठी प्रशांत अवचटे, सुभाष खिलवाणी, राजू पालीवाल, प्रकाश देशमुख, लेकराम ठाकरे, गोपाल पारधी, शुध्दोधन मेश्राम, कटुजी अलोणे, योगेश सांगडे, उपसरपंच दादाजी पिल्लारे, सरपंच कल्पना खंडाते, उपसरपंच गोपाल परशुरामकर, टिकाराम मडावी यांनी परिश्रम घेतले.

Web Title: The government is trying to extend the reservation by ten years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.