शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
2
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
3
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
4
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
5
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
6
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
7
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
8
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
9
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
10
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
11
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
12
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
13
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
14
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
15
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
16
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
17
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
18
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
19
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
20
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाला व बागायतदार शेतकऱ्यांना अच्छे दिन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2022 05:00 IST

महाराष्ट्र उन्हाने होरपळत असून विजेचे संकट गडद होत आहे. शेतकरी राजा अत्यल्प पाण्यात अधिक उत्पन्नासाठी प्रयत्न करीत आहे. मात्र निसर्गाने आपले रूप बदलले असून मे महिन्याचे हेवी तापमान एप्रिल महिन्यातचं जाणवले आहे. यामुळे पारंपारिक अधिक पाण्याची पिके सुमार संकटात आले असून कमी पाण्याची पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वळत आहे.  जिल्ह्यात केवळ २५ ते ३५ टक्के पर्यंत भाजीपाल्याचे उत्पन्न घेतले जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : असह्य उन्हाळा सुरू आहे. भूजल पातळी खालावलेली आहे. धानाचा शेतकरी संकटात आहे. अशा संकटकाळात बागायती, भाजीपाल्याची शेती शेतकऱ्यांना वरदान ठरत आहे. गत वर्षभरापासून भाजीपाल्याला अच्छे दिन! दिसत आहेत. वांग्याला प्रति किलो ३० ते ३५ रुपयाचा दर मिळत आहे. एकरामागे शेतकऱ्याला लक्ष रुपयांचा नफा अपेक्षित मिळत आहे.महाराष्ट्र उन्हाने होरपळत असून विजेचे संकट गडद होत आहे. शेतकरी राजा अत्यल्प पाण्यात अधिक उत्पन्नासाठी प्रयत्न करीत आहे. मात्र निसर्गाने आपले रूप बदलले असून मे महिन्याचे हेवी तापमान एप्रिल महिन्यातचं जाणवले आहे. यामुळे पारंपारिक अधिक पाण्याची पिके सुमार संकटात आले असून कमी पाण्याची पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वळत आहे. जिल्ह्यात केवळ २५ ते ३५ टक्के पर्यंत भाजीपाल्याचे उत्पन्न घेतले जात आहे. उर्वरित क्षेत्रात इतर शेत पिके घेतले जातात. मात्र यात जोखीम व खर्च अधिक असल्याने शेतकऱ्यांच्या पदरात अपेक्षित नफा पडताना दिसत नाही. भाजीपाल्याची शेती करणारा शेतकरी मात्र समाधानी असून दररोज नगदी आवक कुटुंबाचा उत्साह वाढविणारा ठरत आहे. जमिनीत सर्वच भाजीपाल्याची व बागायती ची पिके घेतले जातात. नगदी पिके समजले जाणारे उत्पन्न निश्चितच शेतकऱ्यांना समाधान देणारी ठरत आहेत. जिल्ह्यातील बागायतदार व भाजीपाला कसणाऱ्या शेतकऱ्यांना मिळत असलेल्या दरानंतर समाधान व्यक्त होत आहे.

बदलत्या हवामानानुसार शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत बदल करावा. गत वर्षभराचा अभ्यास केल्यास प्रत्येकच भाजीपाल्यातील भाज्यांनी शेतकऱ्यांना चांगले भाव दिले आहेत. कमी पाण्याची शेती स्वीकारा. भाजीपाल्यासाठी २४ तास बीटीबी सब्जी मंडी सेवेत आहे.  -बंडू बारापात्रे, अध्यक्ष बीटीबी भंडारा. धानापेक्षा तरी भाजीपाल्याची शेती परवडणारी आहे. केवळ ४५ दिवसात घरात नगदी आवक सुरू होते. तंत्रशुद्ध नियोजन केल्यास लक्ष रुपये एकराला नफा मिळण्यास अडचण नाही.-दुर्गेश कांबळे, कारले उत्पादक,  खोलमारा मिरची पिकाला योग्य नियोजनाअंती सहजतेने लक्ष रुपये उरतात. एक मिरचीचा तोळा ६० ते ८० हजार रुपयांपर्यंत गेला. कमी पाण्यात अधिक उत्पन्नासाठी भाजीपाल्याची शेती निश्चितच फायद्याची आहे.-अरुण पडोळे, मिरची उत्पादक पालांदूर. माझ्याकडे फळबाग आहे. कमी पाण्यात व्यवस्थित नियोजन होतो. एका एकराला लक्ष रुपयापेक्षा अधिक नफा मिळतो.-पराग शांतलवार, शेतकरी  माडगी.  

 

टॅग्स :Farmerशेतकरीvegetableभाज्या