शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

वरठी पोलीस ठाण्याला जागा द्या

By admin | Updated: September 11, 2016 00:37 IST

वरठी येथील नवनिर्मित पोलीस ठाण्यासाठी गट क्र. ४८३/१ ही ०.४४ हेक्टर शासकीय जागा देण्यात यावी,...

धरणे आंदोलन : जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन भंडारा : वरठी येथील नवनिर्मित पोलीस ठाण्यासाठी गट क्र. ४८३/१ ही ०.४४ हेक्टर शासकीय जागा देण्यात यावी, या मागणीसाठी महिला अत्याचार विरोधी सामाजिक न्यायमंच भंडाराच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.सन २०१२ पासून या जागेच्या मागणीसाठी शासनाला मागणी करण्यात येत आहे. ही जागा मिळावी म्हणून बेमुदत आमरण उपोषण करण्यात आले होते. त्यावेळी मोहाडीचे तहसीलदार सुर्यवंशी यांनी उपोषण मंडळात येऊन आश्वासन दिले होते. जाहीरनामा सुद्धा काढला. त्या जाहिरनाम्यावर कुणीही आक्षेप घेतला नाही. तत्कालीन जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी वरठी पोलीस ठाण्याच्या उद्घाटन प्रसंगी जागा मिळवून देण्याची घोषणा केली होती. या गट क्रमांकाची जागा वरठी पोलीस ठाण्याला देण्यात येणार होती. परंतु अजूनपर्यंत ती जागा मिळालेली नाही. वरठी पोलीस ठाणे भाड्याच्या ठिकाणी असून आरोपींना ठेवण्यासाठी पर्यायी व्यवस्था नाही. पोलिसांना बसण्यासाठी व्यवस्था नाही. तक्रारकर्त्यांना गैरसोयीचे आहे. अशा परिस्थितीत नवीन ठिकाणी ईमारतीचे बांधकाम व्हावे, यासाठी महसूल विभागाकडून रिकामी असलेली जागा मागण्यात आली आहे. जनतेसाठी सेवा देणाऱ्या पोलीस विभागाला महसूल विभागाकडून जागा मिळत नसेल तर सामान्य जनतेचे कसे होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या जागेच्या मागणीसाठी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करीत महसूल निवासी जिल्हाधिकारी विजया बनकर यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले. यावेळी महिला अत्याचार विरोधी सामाजिक न्यायमंचाचे संस्थापक विष्णूदास लोणारे, सचिव त्रिवेणी वासनिक, सूरज परदेशी, बळीराम सार्वे, शरद कढव, कन्हैय्या नागपुरे, ज्ञानेश्वर निकुरे, कविता लोणारे, द्रोपदा टेंभुर्णे यांनी निवेदन दिले असून माजी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी धरणे आंदोलन ठिकाणी भेट देऊन निवेदन स्वीकारून या जागेसाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. (शहर प्रतिनिधी)