शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

गणित शिक्षक द्या, अन्यथा आंदोलन

By admin | Updated: October 7, 2015 01:53 IST

नवप्रभात हायस्कूल, कान्हळगाव येथे इयत्ता नववी व दहावी करीता गणित विषयाचा शिक्षक नाही आहे.

विद्यार्थी पालकांची मागणी : कान्हळगाव येथील प्रकारमोहाडी : नवप्रभात हायस्कूल, कान्हळगाव येथे इयत्ता नववी व दहावी करीता गणित विषयाचा शिक्षक नाही आहे. एका आठवड्यात शिक्षकाची पूर्तता करण्यात आली नाही तर शाळा बंद आंदोलन करण्याचा इशारा विद्यार्थी, पालकांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन संस्था सचिव, अध्यक्ष, शिक्षण उपसंचालक, नागपूर, शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद, भंडारा व गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती मोहाडी यांना देण्यात आले आहेत.नवप्रभात हायस्कूल कान्हळगाव येथे सत्राच्या सुरूवातीपासून इयत्ता नववी व दहावीला गणित विषय शिकविण्यासाठी शिक्षकच नाही आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान केले जात आहे. मागील दोन वर्षीही गणिताचा शिक्षक देण्यात आला नव्हता. शाळा स्तरावर बीएससी नापास असलेल्या एका व्यक्तीची तासिका नुसार गणित विषय शिकविण्याकरीता व्यवस्था करण्यात आली होती. मात्र नवप्रभात शिक्षण संस्था सचिव अध्यक्ष यांनी गणित विषयाचा शिक्षक पुरविला नाही. मागील शैक्षणिक समात काही महिने पाठक नामक गणिताच्या शिक्षिका आल्या होत्या. पण त्यांची मुख्याध्यापक पदावर पदोन्नती झाली. त्यांना वरठी येथे पाठविण्यात पदोन्नतीवर पाठविण्यात आले. आता शैक्षणिक सत्राच्या प्रारंभापासून गणित विषय शिक्षण देण्यासाठी शिक्षक नाही आहे. उलट एकाच शाळेत दोन विज्ञान विषयाचे शिक्षक आहेत. एकाच विज्ञान शिक्षकाची गरज असताना संस्थेने पुन्हा एक शिक्षिकेला नवप्रभात हायस्कूल कान्हळगाव येथे पाठविले. मात्र अर्धा शैक्षणिक सत्र संपण्याच्या वाटेवर आला असतानाही संस्थेने गणिताचा शिक्षक दिला नाही. नवप्रभात शिक्षण संस्थेतर्फे शिक्षणाधिकारी माध्यमिक जि.प. भंडारा यांना एका गणित शिक्षकाची बदली करण्याची परवानगी मागितली असल्याचे समजते. अजुनही शिक्षणाधिकाऱ्यांनी कार्यवाही केली नाही. नवप्रभात हायस्कूल कान्हळगाव येथे दि. १४ आॅक्टोबरपर्यंत गणित विषयाचा शिक्षक देण्यात आला नाही तर शाळा बंद आंदोलन करण्याचा इशारा विद्यार्थी व पालकांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)