शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
3
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
4
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
5
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
6
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
7
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
8
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
9
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
10
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
11
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
12
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
13
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
14
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
15
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
16
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
17
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
18
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
19
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
20
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हास्तरावर दलित वस्ती योजनेचा निधी पडून

By admin | Updated: November 13, 2014 22:58 IST

महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांमधील कुटुंबांना खासगी नळजोडण्या व वैयक्तिक शौचालय सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी ग्रामीण दलित वस्ती पाणी

भंडारा : महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांमधील कुटुंबांना खासगी नळजोडण्या व वैयक्तिक शौचालय सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी ग्रामीण दलित वस्ती पाणी पुरवठा व स्वच्छता योजना राबविण्याचा शासन निर्णय आहे. मात्र जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता एस. एस. सुशिर यांनी योजनेची अंमलबजावणी शासननिर्णयानुसार केली नाही. परिणामी जिल्हास्तरावर योजनेचा निधी पडून आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींना कराचा अतिरिक्त बोझा सहन करावा लागत आहे. महाराष्ट्र सुवर्ण महोत्सवी दलित वस्ती योजनेअंतर्गत शौचालय बांधकामासाठी ११ हजार रुपये, नळ जोडणीसाठी ४ हजार रुपये देणे अपेक्षित होते. याविषयी शासन निर्णय जिल्हा परिषदेला प्राप्त झालेला आहे. शासन निर्णय दिनांक १८ नोव्हेंबर २०११ ची प्रत जिल्हा परिषदेला प्राप्त झालेली आहे. ज्या शासन निर्णयानुसार कार्यकारी अभियंतानी कुठलीही कारवाई केलेली नाही. शासन निर्णयानुसार या योजनेअंतर्गत ग्राम पंचायतीला ५० टक्के अनुदान अग्रीम स्वरुपात देणे आवश्यक होते. विभागीय स्तरावर ई-निविदा करणे आवश्यक होते. मात्र कार्यकारी अभियंत्यांनी या शासन निर्णयाला केराची टोपली दाखविली आहे. योजनेची अंमलबजावणी मनमर्जीनुसार करण्यात येत आहे. ग्राम पंचायतशी करारनामा करुन कामे करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामुळे ग्राम पंचायतीच्या देयकातून ५ टक्के विक्रीकर, १ टक्का उपकर व १ टक्का विमा अशा एकूण ७ टक्के कराचा अतिरिक्त बोझा ग्राम पंचायतीला सहन करावा लागत आहे. परिणामी या योजनेची कामे रेंगाळली आहे. या योजनेचा निधी ग्रामीण पाणी पुरवठा विभागीय स्तरावरच जमा असल्यामुळे कामे रखडलेली आहेत. एकीकडे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता अभियान कार्यक्रमाला प्राधान्य दिले असले तरी भंडारा जिल्हयात मात्र अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे या योजनेचा निधी पडून आहे. त्यामुळे अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांमधील कुटूंबांचा विकास रखडला आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे. (नगर प्रतिनिधी)