शहरं
Join us  
Trending Stories
1
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
2
CBSE 10th Result 2026: CBSE १० वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; 'असा' पाहा रिझल्ट
3
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
4
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
5
Latest Marathi News LIVE Updates: "धारावीकरांना हुसकावून लावण्यासाठी ९५ टक्क्यांपेक्षा जास्त...", काँग्रेस खासदारांचा गंभीर आरोप
6
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
7
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
8
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
9
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
10
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
11
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
12
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
13
Vastu Shastra: घरात सुख-समृद्धी हवी आहे? मग एकदा भिंतीवरची चित्र बदलून पाहाच!
14
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
15
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
16
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
17
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
18
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
20
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
Daily Top 2Weekly Top 5

रेतीघाटाहून चार ट्रक, जेसीबी जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 21:56 IST

तालुक्यातील रेती घाटांवर मोठ्या प्रमाणात अवैध रेतीची खुलेआम वाहूतक होत असल्याचे वृत्त प्रकाशित होताच जिल्हा भरारी पथकाने प्रत्येक रेतीघाटावर निगराणी सुरु केली आहे. बोथली पांजरा रेती घाटावरून चार ट्रक व एक जेसीबी जप्त करण्यात भरारी पथकाला यश आले.

ठळक मुद्देभरारी पथकाला यश : दंडानंतरही रेतीची चोरी सुरूच

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : तालुक्यातील रेती घाटांवर मोठ्या प्रमाणात अवैध रेतीची खुलेआम वाहूतक होत असल्याचे वृत्त प्रकाशित होताच जिल्हा भरारी पथकाने प्रत्येक रेतीघाटावर निगराणी सुरु केली आहे. बोथली पांजरा रेती घाटावरून चार ट्रक व एक जेसीबी जप्त करण्यात भरारी पथकाला यश आले. अस असले तरी रेती तस्करावर याचा कोणताच परिणाम झाल्याचे निदर्शनास येत नसून पुन्हा जोमात रेतीची चोरी सुरुच आहे.मोहाडी तालुक्यातील बोथली, पांजरा, पाचगाव, नेरी, मुंढरी बुज, मोहगाव देवी, रोहणा, रोहा, बेटाळा तर, तुमसर तालुक्यातील परंतु मोहाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ढोरवाडा या रेती घाटातून मोठ्या प्रमाणात रेती चोरी सुरुच आहे.मोहाडी तालुक्यातील पांजरा (बोथली) येथील सूर नदीतून रेती काढून जवळच डंपींग केली जाते. नंतर जेसीबीच्या सहाय्याने ट्रक, टिप्पर भरून ती रेती नागपुरकडे पाठविली जाते. मोहाडी तालुक्यातून नागपूर पर्यंत रेती नेण्यासाठी मध्यप्रदेशातील रॉयल्टीचा उपयोग केला जातो.रेती घाटावरून राज्य मार्गावर येण्यापर्यंतच त्यांच्याकडे रॉयल्टी नसते. राज्य मार्गावर येताच रॉयल्टीसह रेतीचा पुढील प्रवास सुरु होतो. विशेष म्हणजे दहा दिवसापूर्वी रोहणा येथे घडलेल्या रेतीच्या ट्रकच्या अपघातात मध्यप्रदेशातील रॉयल्टी जप्त करण्यात आली आहे.२३ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता जिल्हा भरारी पथकाने पांजरा (बोथली) घाटावर रेती भरण्यासाठी आलेले ट्रक मालक प्रवीण रामचंद्र समरीत डोंगरगाव यांचे ट्रक क्रमांक एमएच ३५ एफ ४४६१, चार ब्रास रेतीसह, एमएच ३६ एए ४४६१, जेसीबी क्रमांक एमएच ३६ झेड ४४६१, ट्रक मालक गोविंद देशकर भंडारा यांचा ट्रक क्रमांक एम.एच. ३५ एफ ५६३२, चार ब्रास रेतीसह असे चार ट्रक व एक जेसीबी जप्त करण्यात येवून मोहाडी पोलीस ठाण्यात जमा करून ठेवण्यात आले आहे.शासनाच्या नियमानुसार चोरीच्या रेती भरलेल्या ट्रॅक्टरवर एक लक्ष २० हजार रुपये तर, ट्रकवर २ लक्ष २५ हजारांचा दंड ठोठावला जातो. एवढा मोठा दंड आकारुनही रेतीची सर्रास चोरी केली जाते. यावरूनच रेतीच्या व्यवसायात अफाट नफा मिळत असल्याचे सांगण्यात येते. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.