माजी आमदार आनंदराव वंजारी यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:35 IST2021-04-21T04:35:09+5:302021-04-21T04:35:09+5:30

आनंदराव वंजारी १९८५ मध्ये भंडारा विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. त्यांनी आपल्या कार्यकाळात भंडारा बसस्थानक, सांस्कृतिक भवन, क्रीडा संकुल, ...

Former MLA Anandrao Vanjari passes away | माजी आमदार आनंदराव वंजारी यांचे निधन

माजी आमदार आनंदराव वंजारी यांचे निधन

आनंदराव वंजारी १९८५ मध्ये भंडारा विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. त्यांनी आपल्या कार्यकाळात भंडारा बसस्थानक, सांस्कृतिक भवन, क्रीडा संकुल, सूर नदीवरील मोठ्या पुलासह दुर्गम भागातील गावांना रस्त्यांनी जोडले होते. भंडारा-गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीचे ते १९ वर्षे अध्यक्ष होते. संताजी सेवा मंडळ, जनहित सामाजिक सेवा संस्था, साईबाबा देवस्थान, भंडारा जिल्हा मजदूर संघ आणि श्री साई अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे ते अध्यक्ष होते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरीपद त्यांनी भूषविले. गुजरात, बिहार, झारखंड आणि राजस्थानचे निरीक्षक म्हणून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. त्यांच्या मागे पत्नी, ॲड. शिशिर, अभिजित ही दोन मुले, मुलगी असा आप्तपरिवार आहे. दुपारी भंडारा येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Former MLA Anandrao Vanjari passes away