शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

देव्हाडी येथे उड्डाणपूल पोचमार्गावरील खड्डे ‘जैसे थे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 22:15 IST

रस्त्यावरील वळणमार्ग धोकादायक स्थितीत कदापी राहू नये असे स्पष्ट निर्देश केंद्रीय रस्ते मंत्रालयाने दिले आहे. परंतु देव्हाडी येथील उड्डाणपुल पोचमार्ग वळणावरील खड्डे बुजविण्याकरिता बारीक दगडी चुरी रस्त्यावर घालण्यात आली आहे.

ठळक मुद्देदुचाकीस्वारांचा जीव धोक्यात : रस्त्यावरील चुरी धोकादायक, जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : रस्त्यावरील वळणमार्ग धोकादायक स्थितीत कदापी राहू नये असे स्पष्ट निर्देश केंद्रीय रस्ते मंत्रालयाने दिले आहे. परंतु देव्हाडी येथील उड्डाणपुल पोचमार्ग वळणावरील खड्डे बुजविण्याकरिता बारीक दगडी चुरी रस्त्यावर घालण्यात आली आहे. चुरीवरून दुचाकी अनियंत्रित होऊन अपघाताची शक्यता बळावली आहे. रात्री अंधारात अपघातात वाढ होत आहे. पोचमार्गावरील खड्ड्यांची स्थिती जैसे थे असून थातूरमातूर खड्डे बुजविण्याचा केविलवाणा प्रयत्न येथे सुरु आहे.तुमसर-गोंदिया राज्य मार्ग नुकताच राष्ट्रीय मार्ग म्हणून घोषित आला आहे. देव्हाडी येथे २४ कोटींचा उड्डाणपुलाचे काम संथगतीने सुरु आहे. तुमसर व गोंदिया रस्त्यावर पोचमार्ग तयार करण्यात आला. काही दिवसातच पोचमार्ग खड्डेमय झाला. खड्ड्यात येथे गिट्टी भरून बुजविण्याचा प्रयत्न यापूर्वी करण्यात आला. अतिशय वर्दळीचा रस्त्यामुळे उड्डाणपुल येथे मंजूर करण्यात आले. पोचमार्गाचे काम गुणवत्तापूर्वक येथे झाले नाही. त्यामुळे दोन्ही पोचमार्गावर धोकादायक खड्डे तयार झाले आहेत. पोच मार्गावर फ्लाय अ‍ॅश पसरल्याने वाहने गेल्याने धुळ सतत उडते. त्यामुळे वाहनधारकांना समोरचे दिसत नाही. खड्ड्यांमुळे येथे अनेक लहान अपघात घडले आहेत. येथे धुळीमुळे व्हीजीबिलीटी अतिशय कमी राहते हे विशेष.शिवसेनेच्या वाहतूक शाखेने संबंधित विभागाला तथा तहसीलदारांना याबाबत निवेदन देऊन तक्रार केली. परंतु त्याची दखल अजूनपर्यंत घेतली नाही. जीव मुठीत घेऊन सदर रस्त्यावरून प्रवास करावा लागतो. मागील चा वर्षापासून वाहतूक कोंडी व खड्डेमय रस्त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.कंत्राटदाराने उड्डाणपुलाजवळील (खापा-देव्हाडी) वळणमार्गावर दगडी चुरी टाकून खड्डे बुजविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. पोचमार्गावरील खड्डे केव्हा बुजविणार असा प्रश्न येथे उपस्थित होत आहे. उड्डाणपुलाचे कामे सुरु होऊन येथे चार वर्षे लोटली. परंतु रस्त्याच्या दर्शनी भागावर अजूनपर्यंत कामांचे माहितीचे फलक लावण्यात आले नाही. उड्डाणपुलाची किंमत, लांबी, कामाचे आदेश केव्हा मिळाले, उड्डाणपुलाचे काम केव्हा पूर्ण होणार याबाबत काहीच माहिती नाही. सूचना फलक का लावले नाही हा संशोधनाचा विषय आहे.दोन्ही बाजूच्या पोचमार्गावरील खड्डे बुजविणे, कारमेट रस्ता तयार करणे येथे गरजेचे आहे. येथे कंत्राटदाराने संबंधित विभागाला संपूर्ण धड्डे बुजविण्याची व रस्ता तयार करण्याची परवानगी मागितल्याचे समजते. परंतु पोचमार्ग तयार करणे, त्याची दुरुस्ती करणे ही कामे कंत्राटदारांच्या करारनाम्यातच सुरुवातीलाच असतात. येथे परवानगी मागण्याची गरज काय? हा मुख्य प्रश्न उपस्थित होत आहे. केवळ वेळ मारून नेण्याचा येथे प्रकार सुरु असल्याचे दिसून येते.