शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

लाखांदुरातील ‘आनंद मेळावा’ हा राज्यातील पहिला प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2016 00:19 IST

जनतेची कामे, विकास कामांची माहिती, शासकिय योजनांचा लाभ हा ठरलेल्या दिवशी किवा तारखेलाच होणे गरजेचे नाही ...

बाळा काशीवार यांचे प्रतिपादन: लाभार्थ्यांना वस्तूंचे वितरण लाखांदूर : जनतेची कामे, विकास कामांची माहिती, शासकिय योजनांचा लाभ हा ठरलेल्या दिवशी किवा तारखेलाच होणे गरजेचे नाही तर तालुक्याच्या ठिकाणी ‘आनंद मेळावा’ सारखे विशेष कार्यक्रमाची संकल्पना संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन आमदार राजेश काशिवार यांनी केले. लाखांदूर येथे आयोजित आनंद मेळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर, जिल्हा परिषद सदस्य रमेश डोंगरे, मनोहर राऊत, माधुरी हुकरे, नगराध्यक्ष निलीमा हुमणे, पंचायत समिती सभापती मंगला बागमारे, ताहसीलदार विजय पवार, नगरपंचायत सदस्य विनोद ठाकरे, नरेश खरकाटे, प्रल्हाद देशमुख, हरीश बागमारे, वासुदेव तोंडरे, शिवाजी देशकर, खंडविकास अधिकारी देवरे उपस्थित होते. यावेळी आ.काशिवार म्हणाले, जनतेच्या लाभाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. आनंद मेळाव्यासारख्या कार्यक्रमातून शासकीय योजनांतून मिळणाऱ्या साहित्यांचे वाटप, अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन, शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. नृत्य, गीत, पथनाट्य सादर करून कार्यक्रमाप्रसंगी योजनांची माहिती यावेळी देण्यात आली. या कार्यक्रमात आरोग्य विभागाच्या वतीने रोगनिदान शिबिर, महिला बचत गटातील महिलांनी स्टाल लावले, सायकलचे वाटप, सिंचन विहिरींना मंजुरी प्रदान करण्यात आली. खंडाविकास अधिकारी देवरे यांनी आनंद मेळावा हा तालुक्यात दरवर्षी घेणार आहे. जिल्हास्तरावर हा मेळावा घेण्यात यावा, जेणेकरून संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांना याचा लाभ घेता येईल. आभार विस्तार अधिकारी मेळे यानी मानले. (तालुका प्रतिनिधी)