शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

अखेर ढिवरवाडा येथे ६७० जनावरांवर औषधोपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:39 IST

ढिवरवाडा येथे ५०० जनावरांचे लसीकरण, १५० जनावरांवर उपचार तर २० जनावरांची गर्भ तपासणी व औषधोपचार करण्यात आले. जनावरांना पायखुरी, ...

ढिवरवाडा येथे ५०० जनावरांचे लसीकरण, १५० जनावरांवर उपचार तर २० जनावरांची गर्भ तपासणी व औषधोपचार करण्यात आले. जनावरांना पायखुरी, तोंडखुरी, घटसर्प व अन्य रोगांची लागण होऊन जनावरे चारा-पाणी पित नाही. शासकीय डॉक्टर उपलब्ध होत नसल्यामुळे पशुपालक परिसरातील खासगी डॉक्टरांकडून औषधोपचार करत आहेत. तरीही किंमती व दुभती जनावरे दगावत असल्याने धामदेव वनवे यांनी सरपंच या नात्याने राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री पशुसंवर्धन योजनेच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधला. जनावरांची गंभीर स्थिती व पशुपालकांच्या वेदना अधिकाऱ्यांच्या कानावर वारंवार टाकल्या. संबंधितांनी लसीकरणासाठी होकारही दिला; परंतु आठवडा लोटूनही पशुविभागाच्या एकाही अधिकाऱ्याने परिसरात येण्याचे व पशुपालकांची भेट घेण्याचे सौजन्य दाखविले नाही. जनावरांचे तडफडून होणारे मृत्यू व पशुपालकांची ओरड वाढल्याने त्यांनी परिसराची कैफियत लोकमतच्या माध्यमातून जनतेच्या दरबारात दमदारपणे मांडली. तत्काळ लसीकरण सुरू करावे, अन्यथा आणखी जनावरांचा मृत्यू झाल्यास त्यास पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरून जनआंदोलन उभारले जाईल, या दरम्यान काही गैरप्रकार झाल्यास त्यास पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी जबाबदार राहतील, असा कडक इशारा धामदेव वनवे यांनी दिली होता तेव्हा कुठे ३१ ऑगस्टला ढिवरवाडापासून लसीकरण शिबिरास प्रारंभ करण्यात आला. शिबिरात पशुधन विकास अधिकारी डॉ. उपवंशी यांनी ६७० जनावरांचे रोगनिदान व औषधोपचार केले. पशुसेवक नंदूरकर, बादल लांडगे, कर्मचारी सपाटे यांनी शिबिरासाठी सहकार्य केले. यावेळी पशुपालकांनी लोकमत चे विशेष आभार मानले.

कोट

वैनगंगा नदी पलीकडील बेटाळा जिल्हा परिषद क्षेत्रातील प्रत्येक गावात आठवड्याभरात रोगनिदान, लसीकरण व औषधाचार शिबिर लावले जातील, नागरिकांनी शिबिरांचा लाभ घ्यावा.

- डॉ. प्रियंका भिवगडे, पशुसंवर्धन उपायुक्त मोहाडी.

030921\1442img-20210831-wa0120.jpg~030921\1442img-20210831-wa0117.jpg

गर्भ तपासणी करतांना डॉ. उपवंशी~शेळ्या वर उपचार