शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
3
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
4
IPL 2026 : अभिषेक-हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
5
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
6
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
7
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
8
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
9
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
10
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
11
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
12
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
13
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
14
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
15
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
16
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
17
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
18
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
19
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
20
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
Daily Top 2Weekly Top 5

बोगस मजुरांच्या नावे रकमेची अफरातफर

By admin | Updated: February 18, 2015 00:24 IST

सामाजिक वनिकरण विभाग भंडारा अंतर्गत तुमसर परिसरात कॅम्पा योजनेअंतर्गत आंबागड ते बपेरा रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड केली.

तुमसर : सामाजिक वनिकरण विभाग भंडारा अंतर्गत तुमसर परिसरात कॅम्पा योजनेअंतर्गत आंबागड ते बपेरा रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड केली. एका मजूराला संरक्षण कामाची मजूरी न देता दुसऱ्या मजुराच्या नावावर मजूरी काढून रकमेची उचल करुन अफरातफर करण्यात आली. या प्रकरणी तक्रार मुख्य वनसंरक्षक तथा सामाजिक वनीकरणाचे उप महासंचालकांना करण्यात आली. या प्रकरणात साक्षी पुराव्यानंतरही कारवाई झालेली नाही.रोपवन संरक्षण मंजूर जयदेव हरीराम जांभूळपाने रा. आंबागड यांनी दिलेल्या तक्रारीत तुमसर परिक्षेत्रातील कॅम्पा योजनेअंतर्गत आंबागड ते बपेरा रस्ता दुतर्फा वृक्ष लागवड १३ अंतर २ किमी मधील कामावर खड्डे खोदण्यापासून ते संरक्षण कामे केली. या कामाची मजूरी मिळाली नाही. उलट संरक्षण कामावर लक्ष्मण पुनाजी चौधरी, सुरेश कुंवरलाल चौधरी, हिवराज कुंवरलाल चौधरी, गणेश बाळकृष्ण राहांगडाले सर्व रा. दावेझरी या मजूरांना आंबागड ते बपेरा रोपवनावर संरक्षण कामावर दाखवून खोटे व्हाऊचर तयार करण्यात आले. या कामाची मजूरी १ लक्ष ५ हजार १८० रकमेची उचल करुन अफरातफर केली आहे. आंंबागड ते बपेरा रस्ता दुतर्फा वृक्ष लागवड १३ मधील रोपवनावर २ किमी अंतरावर एक हजार रोपाकरिता संरक्षण कामावर केवळ एका मजूराची तरतुद आहे. संरक्षण कामावर नियमित असलेले मजूर जयदेव जांभूळपाने यांना मजूरीचे रक्कम सुपारे ८० ते ९० हजार मिळाली नाही. जांभूळपाने यांचा प्रति दिवस २८४ रुपये मजूरी देण्याचे ठरले होते. संरक्षणाची जबाबदारी ३ सप्टेंबर २०१३ ते ३१ मार्च २०१४ पर्यंत जांभूळपाने यांनी सांभाळली. १ एप्रिल २०१४ पासून संरक्षण कामावर कुणीही नाही. शासनाच्या नियमानुसार संरक्षणाचा कार्यकाळ २०१६ पर्यंत आहे. सामाजिक वनीकरण विभागाचे तुमसर परिक्षेत्रातील लागवड अधिकारी डी. जी. चौधरी आहेत. चार बोगस मजूरांचे बयान घेऊन पंचासमोर त्यांनी कामे केली नाही असे बयान देऊन स्वाक्षरी केली. चुकीची माहिती तयार करुन पैशाची उचल करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी केली. आंबागडचे उपसरपंच प्रमोद कटरे, प्रेस चौधरी व दावेझरीचे पोलिस पाटील जयदेव राहांगडाले हे पंच म्हणून उपस्थित होते.या प्रकरणाची चौकशी करण्याकरिता चौकशी अधिकारी म्हणून सहाय्यक संचालक एन. डब्ल्यू. कावळे यांची नियुक्ती करण्यात आली होती. पंरतु सहाय्यक संचालक कावळे चौकशी करीता आले नाही. यासंदर्भात जांभूळपाने यांनी सामाजिक वनीकरण विभागाचे सहाय्यक संचालक कावळे यांचेशी संपर्क केला तेव्हा संचालक श्रीखंडे यांनी बयान घेण्याकरिता जाऊ नका असे सांगितले. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली तर मोठे घबाड बाहेर येण्याची शक्यता आहे. (तालुका प्रतिनिधी)