शहरं
Join us  
Trending Stories
1
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
4
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
5
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
6
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
7
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
8
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
9
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
10
सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'
11
न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
12
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
13
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
14
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
15
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
16
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
17
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
18
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
20
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांचा अशैक्षणिक फेरफटक्यावर कुंपण

By admin | Updated: September 22, 2014 23:15 IST

कोणतेही शासकीय काम नसतानाही अनधिकृतपणे अनेकवेळा काही शिक्षक जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये किंवा इतरत्र अध्यापनाच्या वेळेत भटकतात. रजा न घेता सदर शिक्षक आपले वैयक्तिक

शिक्षकांची नेतागिरी अडचणीत : अध्यापन सोडून भटकणे बंदसाईनाथ कुचनकार - चंद्रपूर कोणतेही शासकीय काम नसतानाही अनधिकृतपणे अनेकवेळा काही शिक्षक जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये किंवा इतरत्र अध्यापनाच्या वेळेत भटकतात. रजा न घेता सदर शिक्षक आपले वैयक्तिक काम करीत असल्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे. यात बहुतांश संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा जास्त प्रमाणात समावेश असतो. आता मात्र अध्यापनाचे काम सोडून शाळेच्या वेळेत भटकणाऱ्या शिक्षकांवर कारवाई होणार आहे. यासंदर्भात शिक्षणाधिकाऱ्यांनी एक अल्टिमेटमच जारी केला असून कोणत्याही कामासाठी तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी यायचे असेल तर रजा काढूनच यावे, असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे ‘नेतागिरी’ करणाऱ्या शिक्षकांवर चांगलाच आळा बसणार आहे.जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर दिवसेंदिवस खालावत आहे. यामुळे बहुतांश पालक आपल्या पाल्यांना जिल्हा परिषद शाळेत दाखल करताना विचार करतात. विशेष म्हणजे, काही शिक्षकांनाच स्वत:च्या शाळेविषयी ‘भरोसा’ नाही. यात काही शाळा आणि शिक्षक अपवाद आहे. ढासळलेली विद्यार्थ्यांची गुणवत्ता पूर्ववत आणण्यासाठी शासकीय स्तरापासून तर, प्रशासकीय यंत्रणेपर्यंत सर्व जण कामाला लागले आहे. मात्र आजही काही शिक्षक पाहिजे तसे सहकार्य करण्याच्या मनस्थितीत नाही. शाळेमधून सुटी न घेताच शैक्षणिक काम असल्याचा आव दाखवून शाळा सुरु असलेल्या वेळेत वैयक्तिक कामावर शिक्षक भर देतात. अनेकवेळा इतरांचे प्रश्न सोडविण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून शिक्षणाधिकारी कार्यालय, पंचायत समिती किंवा गावात इतरत्र फिरतात. शिक्षक सुटीवर असल्याने विद्यार्थीही वाट्टेल तिथे फिरतात. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होते. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांमध्ये शिस्त यावी यासाठी प्रथम बुट्टी मारणाऱ्या शिक्षकांना शिस्त लावणे गरजेचे आहे. यासाठी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) रविकांत देशपांडे यांनी अलिकडेच शिक्षकांना शाळेच्या वेळत रजा न घेता फिरताना दिसल्यास कारवाई करण्याच्या आदेश दिला आहे. एवढेच नाही तर, त्यांनी शिक्षकांचे काही प्रश्न असतील तर त्यांनी पत्राद्वारे कळवावे. शाळा सुरु होण्यापूर्वी किंवा बंद झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना भेटावे, असेही सांगितले आहे. शिक्षकांना आपल्या वैयक्तिक कामासाठी शाळेच्या वेळेत येता येणार नाही. यायचे असेल तर रजा काढूनच यावे असेही म्हटले आहे. यामुळे काही शिक्षकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. मात्र त्यांच्या या आदेशाचे बहुतांश शिक्षक संघटनांनी अभिनंदन केले आहे.