कार ट्रॅक्टरवर आदळून वडील ठार, मुलगा गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:56 IST2021-01-08T05:56:09+5:302021-01-08T05:56:09+5:30

तुषार येरपुडे (४०, रा. वारासिवनी, मध्यप्रदेश) असे मृताचे नाव आहे. तर आरव तुषार येरपुडे (५) असे जखमी बालकाचे नाव ...

Father killed, son seriously injured in car-tractor collision | कार ट्रॅक्टरवर आदळून वडील ठार, मुलगा गंभीर

कार ट्रॅक्टरवर आदळून वडील ठार, मुलगा गंभीर

तुषार येरपुडे (४०, रा. वारासिवनी, मध्यप्रदेश) असे मृताचे नाव आहे. तर आरव तुषार येरपुडे (५) असे जखमी बालकाचे नाव आहे. तुषार आपला मुलगा आरवसह मध्यप्रदेशातील वारासिवनी येथून नागपूरकडे बुधवारी जात होते. रात्री ८ वाजताच्या सुमारास मोहगाव देवीजवळ तुषारचे कारवरून नियंत्रण सुटले. भरधाव कार समोरून लोखंडी खांब घेऊन येणाऱ्या ट्रॅक्टरवर जाऊन आदळली. या अपघाताची माहिती होताच मोहगावदेवीसह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तुषार आणि आरव यांना तत्काळ मोहाडीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, काही वेळातच कार चालवित असलेले तुषार येरपुडे यांचा मृत्यू झाला. बालकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

ट्रॅक्टरचे दोन तुकडे

अपघात एवढा भीषण होता की कारच्या धडकेने ट्रॅक्टरचे मध्यातून दोन तुकडे झाले तर कारचाही चेंदामेंदा झाला होता. गावकऱ्यांनी मोठ्या प्रयत्नाने कारमधून जखमी तुषार आणि आरव यांना बाहेर काढले.

Web Title: Father killed, son seriously injured in car-tractor collision