शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनाच्या विरोधात करणार उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2016 01:24 IST

सततच्या दुष्काळामुळे फक्त शेतीच्या व्यवसायावर उदरनिर्वाह होत नसल्याने पुरक व्यवसायाकडे वळले व ट्रॅक्टर खरेदी केला.

पोलिसात निवेदन : ट्रॅक्टर चालक, मालक, हमाल, बेलदार व मजूरांचा इशारातुमसर : सततच्या दुष्काळामुळे फक्त शेतीच्या व्यवसायावर उदरनिर्वाह होत नसल्याने पुरक व्यवसायाकडे वळले व ट्रॅक्टर खरेदी केला. परंतु गत दोन महिन्यापासून पोलीस प्रशासन, महसूल विभाग तसेच वनविभागातर्फे व्यवसाय करण्यास मज्जाव होत आहे. त्यामुळे परिवारावर उपासमारीची पाळी आल्याने ट्रॅक्टर चालक, मालक, हमाल, बेलदार व मजूर वर्ग ८ फेब्रुवारीपासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणावर बसणार असल्याचे निवेदन पोलिसांना सोपविले.अस्मानी संकटामुळे तर कधी सुलतानी संकटामुळे शेतीवर अवलंबून असलेल्या परिवाराचे उदरनिर्वाह होणे शक्य नाही. दिवसेंदिवस वाढत असलेली महागाई व धानाला मिळणारा अतिअल्प भाव व तालुक्यात उद्योगधंदे बंद असल्यामुळे शेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे धाव घेतली. विटा भट्टी, रेती, मुरुम, भरण, माती, बदरी कारटिंगचा व्यवसाय सुरु केला होता. मात्र त्यातही पोलीस प्रशासन, महसूल व वन विभागाने त्रास देणे सुरु केले आहे. गुन्हे दाखल करण्यासोबत अवाजवी वसुली सुरु झाल्याने सर्व कामे बंद पडली आहेत. परिणामी व्यवसायातून उत्पन्न होणे बंद झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली असल्याने तुमसरात संघटना तयार झाली व अल्प दरात रेती उपलब्ध करून देणे, मुरुम, माती, बदरी आदी गौण खनिज मलमा भरणा ने आण करण्याकरिता सुट देणे, ट्रॅक्टरमालकांवर गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया बंद करणे, महसूल विभागातर्फे १०० रु. स्टँप पेपरवर हमीपत्र लिहून घेणे बंद करणे आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदार, उपविभागीय अधिकारी तसेच पोलीस विभागामार्फत मुख्यमंत्री राजस्वमंत्री, खासदार, आमदार, जिल्हाधिकारी यांना पाठवून दि. ८ फेब्रुवारीला माताटोली येथील कृष्णमंदिरापासून भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचे निवेदनात नमुद केले. यावेळी संघटनेचे सचिन लांजेवार, बाल्या राऊत, बादल खोब्रागडे, सलाम तुरक, बाल्या भुरे, बाळा लांजेवार, बंटी भुरे, आरिफ पटेल, सुनिल चकाले, संतोष महाकाळकर, हरिष ढोके, दिनेश ढोके आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)