शहरं
Join us  
Trending Stories
1
MLC Election Maharashtra: महाराष्ट्रात पुन्हा निवडणूक! विधान परिषदेच्या १६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक
2
"जगात असा एकही देश नाही, जेथे...!"; डच पंतप्रधानांच्या 'चिंते'ला भारताचं सडेतोड उत्तर दिले
3
Top Marathi News LIVE: ट्रक-व्हॅनचा भीषण अपघात, १० प्रवाशांचा मृत्यू, मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश
4
Twisha Sharma: 'मी अडकलेय रे, पण तू अडकू नकोस', ट्विशाचा मीनाक्षीला मेसेज, त्यानंतर मृत्यूचीच बातमी आली; असं काय घडलं?
5
अशोक सराफ यांचा मुलगा अनिकेतही कान्समध्ये पोहोचला, आईचा फोटो शेअर करत म्हणाला...
6
'राजा शिवाजी' ठरला ब्लॉकबस्टर! १०० कोटी कमावणारा मराठीतला दुसरा सिनेमा, 'सैराट'चा विक्रम मोडणार?
7
"दीपिकाच्या शरीरावर जखमांच्या खुणा, हुंड्यासाठी केली हत्या"; काकांचा खळबळजनक दावा
8
इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये चूक झाल्यास आता डिलीट करायची झंझट मिटली; कंपनीने आणले भन्नाट 'Edit' फीचर!
9
Pavala Shyamala : ग्लॅमरच्या दुनियेतून थेट रस्त्यावर; पैसे नसल्यामुळे ज्येष्ठ अभिनेत्रीला रुग्णालयाने नाकारले उपचार
10
Fact Check: विश्वास नांगरे पाटील यांच्याबाबतचे 'ते' क्रिएटिव्ह FAKE; 'लोकमत'चे नाव आणि लोगो वापरून दिशाभूल
11
गोरखपूर इंजिनिअर मृत्यू प्रकरण; नवऱ्याला मृत्यूच्या दारात ढकलणारी 'ती' क्रूर पत्नी अखेर गजाआड
12
ना भरपाई देणार, ना मालमत्ता मुक्त करणार; आणि युरेनियम...; इराणच्या प्रस्तावावर अमेरिकेच्या पाच कठोर अटी
13
Neet Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट! लातूरचे प्राध्यापक शिवराज मोटेगावकर सीबीआयच्या ताब्यात
14
सासाराम स्टेशनवर 'बर्निंग ट्रेन'चा थरार! पाटणा पॅसेंजरला लागली भीषण आग, एक बोगी जळून खाक
15
Hirkani Tigress: चकवा देणारी ‘हिरकणी’ पुन्हा कॅमेऱ्यात कैद; गळ्यातील जीपीएस कॉलर मात्र गायब
16
संसार वाचवण्याचे 'तोडगे' ठरले अपयशी अन् तिने मृत्यूला कवटाळले; उच्चशिक्षित विवाहितेचा करुण अंत
17
Earthquake In china : चीनमध्ये ५.२ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप! भीषण हादऱ्यांनी इमारती जमीनदोस्त, दोघांचा मृत्यू
18
"मी घाईत आहे...", घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान मौनीने पापाराझींना टाळलं, पण पुढे काय घडलं पाहा
19
'लग्नात स्कॉर्पिओ दिली, आता फॉर्च्युनर मागत होते'; सासरच्यांचा जाच! लग्नाच्या १४ महिन्यातच दीपिकाने संपवलं आयुष्य
20
Crime News: रेल्वेत सापडलेली पत्र्याची पेटी उघडताच दिसला तरुणीचा शीर नसलेला मृतदेह, अनेक तुकडे; रेल्वे स्थानकात खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

नदीकाठावरील शेती संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 05:01 IST

जिल्ह्यातील या दोन नद्यांमुळे शेतकरी समृध्द झाले असले तरी नदीकाठावरील वाढते अतिक्रमण, रेतीघाटांमुळे नदीचे पात्र विस्तारीत होत असल्याने अनेक शेतकºयांची शेती पाण्यामध्ये बुडीत क्षेत्रात गेली आहे. अलीकडील काळात पावसामुळे नदीकाठावरील जमिन सातत्याने पाण्याखाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील हजारो शेतकºयांची शेती वैनगंगा नदीपात्रात सामावली आहे.

ठळक मुद्देबावनथडी व वैनगंगा नदी : जिल्हा प्रशासनाविरुद्ध शेतकऱ्यांमध्ये संताप

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : तुमसर तालुक्यात शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणाºया बावनथडी आणि वैनंगगा नदीकाठावरील हजारो शेतकºयांची बागायती शेती संकटात आली आहे.
जिल्ह्यातील या दोन नद्यांमुळे शेतकरी समृध्द झाले असले तरी नदीकाठावरील वाढते अतिक्रमण, रेतीघाटांमुळे नदीचे पात्र विस्तारीत होत असल्याने अनेक शेतकºयांची शेती पाण्यामध्ये बुडीत क्षेत्रात गेली आहे. अलीकडील काळात पावसामुळे नदीकाठावरील जमिन सातत्याने पाण्याखाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील हजारो शेतकºयांची शेती वैनगंगा नदीपात्रात सामावली आहे. याचा फटका अल्पभूधारक शेतकºयांना बसत असून वैनगंगा नदीकाठावर गावे असणाºया शेतकºयांवर नवीन संकटे येत आहेत. अनेक शेतकºयांनी कर्ज काढून शेतात विहिरी खोदल्या होत्या. शेतकºयांच्या सातबारावर कर्जाची नोंद असताना नदीकाठावरील शेती आणि त्याला लागून असणाºया विहिरीसुध्दा पाण्याखाली गेल्या आहेत. नदीपात्राच्या वाढत्या विस्तारीकरणामुळे तालुक्यासाठी वरदान ठरणाºया नद्या शेतकºयांसाठी कर्दनकाळ ठरु पाहत आहेत.
तुमसर तालुक्यातील अडीच हजार लोकवस्तीच्या बपेरा गावात बहुतांश शेतकरी आहेत. बावनथडी नदीकाठावर शेतकºयांची बागायती शेती आहे. या शेतकºयांसाठी नदीचे वाढते पात्र कर्दनकाळ ठरत आहे. बावनथडी नदीच्या पात्राने मध्यप्रदेश व महाराष्ट्र राज्याच्या सिमाभागांची विभागणी केली आहे. आधी नाला स्वरुपात असलेल्या नदी पात्राने आता विशाल रुप धारण केले आहे. नदीचे पात्र गावाच्या दिशेने दिवसेंदिवस वाढत आहे.
बावनथडी नदीच्या वाढत्या पात्रात बपेरा गावातील शेतकºयांची ८७ हेक्टर आर बागायती शेती गिळंकृत झाली आहे. यामध्ये २० हून अधिक विंधन विहिरी भुईसपाट झाल्या आहेत. नदीकाठावरुन विहिरीचे अवशेष आजही साक्ष देत आहेत. गावातील शेतकºयांवर वाढत्या पात्राने मोठे संकट ओढावले आहे.
नदीपात्राजवळील शेती पाण्यात गेल्याने अनेक शेतकरी शेतमजूर झाले आहेत तर अनेकांना भुमिहीन होण्याची वेळ आली आहे. अनेक शेतकरी भूमिहीन झाल्याने काहीजणांनी गावही सोडले आहे. वडिलोपार्जित शेती नदीपात्रात गेल्याचे दु:ख गावातील शेतकºयांच्या चेहºयावर दिसून येत आहे. मात्र शासनाकडून हे शेतकरी कायमच दुर्लक्षित राहिले आहेत.
नदीपात्रात शेती गेल्याच्या समस्येमुळे बपेरा, चुल्हाड, सुकळी, वांगी, परसवाडा, तामसवाडी, पांजरा, नवरगाव, बोरी, उमरवाडा, चारगाव आदी गावातील शेतकरी भूमिहीन झाल्याने शासनाने यांना रोजगार उपलब्ध करुन देण्याची मागणी जोर धरु लागली आहे. यासाठी जिल्हा प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप शेतकºयांकडून होत आहे.

रोजगारासाठी शहराकडे पलायन
नदीकाठावरील शेतीचे मोठे नुकसान झाल्याने शेतकºयांवर उपासमारीची वेळ आली आहे. उदरनिर्वाह करण्यासाठी शेतकरी रोजगारासाठी शहराकडे पलायन करीत आहेत. भंडारा जिल्ह्यातील प्रमुख वैनगंगा व बावनथडी नदी काठावरील शेतकºयांची शेती पाण्याखाली राहत असल्याने त्यांना उत्पादन मिळत नाही. याविषयी प्रशासनाला माहिती असतानाही नदी काठावरील नागरिकांची समस्या सोडविण्यासाठी धजावत नाही. त्यामुळे नदीकाठावरील शेतकरी संकटात आहेत.

टॅग्स :agricultureशेती