शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
2
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
3
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
4
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
5
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
6
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
7
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
8
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
9
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
10
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
11
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
12
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
13
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
14
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
15
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
16
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
17
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
18
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
19
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
Daily Top 2Weekly Top 5

धान्य विक्रीसाठी आता शेतकऱ्यांना कसरत करावी लागणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:40 IST

भंडारा : तालुक्यातील खरबी नाक्यासह परिसरातील शेतकऱ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून धान विक्रीसाठी प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. मात्र, शेतकऱ्यांची ...

भंडारा : तालुक्यातील खरबी नाक्यासह परिसरातील शेतकऱ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून धान विक्रीसाठी प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. मात्र, शेतकऱ्यांची समस्या ही मी अनेक दिवसांपासून स्वतः जाणून होतो. त्यामुळे प्रशासनाकडे गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांसाठी वारंवार पाठपुरावा केल्याने आज खऱ्या अर्थाने बळीराजाचे धान्य खरेदी विक्री केंद्राचे उद्घाटन करताना मला मनापासून आनंद होत असल्याचे प्रतिपादन आ. नरेंद्र भोंडेकर यांनी केले.

तालुक्यातील खरबी नाका येथे धान्य खरेदी केंद्राच्या उद्घाटनाच्या समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य नीता आकरे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच रत्नमाला वाडीभस्मे, खरबीचे उपसरपंच संजय आकरे, ठाण्याच्या सरपंच सुषमा पवार, परसोडीच्या सरपंच कल्पना मोटघरे, ठाण्याच्या माजी सरपंच कल्पना निमकर, साहुलीच्या सरपंच संगीता हटवार, खराडीच्या सरपंच माया हिवसे, शहापूरचे माजी सरपंच दादा सेलोकर, बालाजी वाघमारे, सुभाष वाडीभस्मे, भाऊराव गिरीपुंजे, दूर्वास आकरे, दीपाली आकरे, संस्था सचिव शालिनी गिरिपुंजे, सीमा मोथरकर, चिखलीच्या सरपंच रंजना वाघमारे, अशोक आकरे, चंद्रशेखर गिरडे, गजू बावनकुळे, भगवान लांडगे, नाना बावनकुळे, विजय हटवार, प्रमोद भस्मे यांच्यासह आदर्श सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्थेचे अध्यक्ष गणेश मोथरकर, अध्यक्ष सुनील गिरिपुंजे, वाल्मीक मोथरकर, विकी गिरिपुंजे, दिनेश भस्मे, रामा आकरे, रणजित गिरिपुंजे, संस्थेचे ग्रेडर सुखमनी साकोरे, श्रीकृष्ण वैद्य, शैलेश मोथरकर, नीलेश मोथरकर, शिवा गिरिपुंजे, योगेश निमकर उपस्थित होते. यावेळी आ. भोंडेकर म्हणाले की, गेल्या अनेक दिवसांपासून संस्थेचे पदाधिकारी सुनील गिरिपुंजे, उपसरपंच संजय आकरे, गणेश मतकर यांनी परिसरातील शेतकऱ्यांची कायमस्वरूपी समस्या सोडविण्यासाठी संस्थेअंतर्गत धान्य विक्रीसाठी खऱ्या अर्थाने पाठपुरावा केल्यानेच खरबी येथे केंद्र मंजूर झाले, त्यामुळे आज बळीराजाचा संघर्ष थोड्याफार प्रमाणात कमी करता आल्याने आज मला समाधान होत आहे.

आता पाण्यासाठी पुढाकार

खरबीचे उपसरपंच संजय आकरे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना धान विक्रीसाठी तब्बल ३० ते ४०, प्रसंगी ५० किलोमीटर अंतरावर धान विक्रीसाठी जावे लागत होते. मात्र, आता शेतकऱ्यांचा संघर्ष संपला आहे. आता पुढच्या टप्प्यात शेतकऱ्यांना हक्काचे पाणी आणि कायमस्वरूपी वीज मिळावी यासाठी संस्थेच्या वतीने पुढाकार घेणार असल्याचे सांगितले.