शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी म्हणतात, पुन्हा धान पीक नको रे बाबा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2022 05:00 IST

या वर्षी धान पिकाने शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आणले. संपूर्ण फेब्रुवारी महिना थंडीत गेला. खताचा व मजूर टंचाईचा सामना करीत अधिक पैसे मोजून रोवणी केली. मार्च महिना उजाडला आणि अर्ध्यात तापमानाने उच्चांक गाठला. पाण्याची पातळी खालावली. अशातच अघोषित भारनियमनाने सात दिवस पाठलाग केला. जमिनीला भेगा पडल्या. धान पिकाला गर्भावस्थेतच पाण्याचा ताण पडला. आज-उद्या म्हणता-म्हणता हप्ता गेला. अघोषित भारनियमनाने शेतकऱ्यांचा घात केला. जेमतेम पाणी आहे, असे शेतकरी सावध झाले आहेत.

मुखरू बागडेलाेकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : वाढते तापमान, त्यातच वीज भारनियमन अशा स्थितीत शेतातील धान पीक पाण्याविना शेतकऱ्यांच्या डोळ्यांदेखत वाळत आहे. मात्र विहीर, बोअरवेलमध्ये पाणी असतानाही विजेअभावी सिंचन करणे कठीण जात आहे. गत काही वर्षांपासून निसर्गाच्या अवकृपेचा फटका सहन करणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा विजेचा जबर झटका बसत आहे. त्यामुळे पुन्हा धान पीक नको रे बाबा...! असे शेतकरी म्हणत आहेत.या वर्षी धान पिकाने शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आणले. संपूर्ण फेब्रुवारी महिना थंडीत गेला. खताचा व मजूर टंचाईचा सामना करीत अधिक पैसे मोजून रोवणी केली. मार्च महिना उजाडला आणि अर्ध्यात तापमानाने उच्चांक गाठला. पाण्याची पातळी खालावली. अशातच अघोषित भारनियमनाने सात दिवस पाठलाग केला. जमिनीला भेगा पडल्या. धान पिकाला गर्भावस्थेतच पाण्याचा ताण पडला. आज-उद्या म्हणता-म्हणता हप्ता गेला. अघोषित भारनियमनाने शेतकऱ्यांचा घात केला. जेमतेम पाणी आहे, असे शेतकरी सावध झाले आहेत. अधिकची जोखीम पत्करून कमी पाण्यात शेतकरी धान पीक घेण्यासाठी आता घाबरलेला आहे. पाणी आहे पण वीज नाही ही मूळ समस्या शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसली आहे. धान पिकापेक्षा तितकाच नफा देणारे एखादे दुसरे पीक घेतलेले बरे, असे शेतकरी सांगत आहेत. शेतकरी प्रशांत सागर यांच्या शेतातील एक एकर धान वाळत आहे.

मका पिकाची होणार अधिक लागवड - वीज व पाण्याचे संकट अनुभवता भविष्यात लाखनी तालुक्यातील चुलबंद खोऱ्यात  भाजीपाला, कडधान्य, मका यासह कमी पाण्याची पिके घेण्याकडे शेतकरी वळणार आहेत. पाण्याशिवाय शेती शक्य नाही. कमी पाण्याची शेती पिके काढण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. शासन सुद्धा ठिंबक सिंचन सुविधाकरिता सकारात्मक आहे.

 

टॅग्स :agricultureशेतीelectricityवीज