शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

धानशेतीत भेगा पडल्याने शेतकऱ्यांचे फाटले काळीज

By admin | Updated: August 28, 2016 00:09 IST

धान पिकाचे मोठ्या प्रमाणात घेवून कर्जाचा बोझा कमी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या बळीराजाला यावर्षी निसर्गाने रडकूंडीस आणले आहे.

तलावाच्या जिल्ह्यात पाण्याचा तुटवडा : शेतकऱ्यांच्या डोळ्यात स्वप्नाऐवजी दिसू लागली अश्रूभंडारा : धान पिकाचे मोठ्या प्रमाणात घेवून कर्जाचा बोझा कमी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या बळीराजाला यावर्षी निसर्गाने रडकूंडीस आणले आहे. कशीबशी रोवण आटोपली मात्र आता धानपिकाला वाचविण्याचा शेतकऱ्यांना शर्तीचा प्रयत्न करावा लागत आहे. जिल्ह्यात पावसाने मोठी उसंत घेतल्याने शेत जमिनीला भेगा पडल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्याचे काळीज फाटल्याची स्थिती निर्माण झाली आहे. मागील काही वर्षांपासून निसर्गाने शेतकऱ्याला हवालदिल केले आहे. कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळाच्या चक्रात अडकलेला शेतकरी यातून बाहेर येण्याचे केवळ स्वप्न बघत आहे. यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस राहील असे भाकित वेधशाळेने वर्तविले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठी स्वप्न रंगवून शेतीच्या हंगामात स्वत:ला झोकून घेतले होते. कर्जबाजारी होवून शेतकऱ्यांनी शेतात बी-बियाणे पेरले. सुरुवातीला हलका पाऊस पडला त्यात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पऱ्हे टाकली. त्यानंतर मध्यम पावसाने हजेरी लावली. अश्यात त्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची व्यवस्था होती त्यांनी रोवणी आटोपली. मात्र त्यांच्याकडे सिंचनाची सुविधा नव्हती ते चातक पक्षाप्रमाणे पावसाची वाट पाहत होता. आज येईल उद्या येईल असा स्थितीत शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोरुन काळेभोर ढग धावत होते. मात्र पाऊस पडला नाही. यास्थितीत शेतकऱ्यांच्या हातातील धानाचे उत्पादन जाण्याची स्थिती निर्माण झाली. अनेकांच्या शेतात पावसाअभावी रोवणी लांबली तर अनेकांच्या अद्यापही खोळंबलेल्या आहेत. अश्या विदारक स्थितीत ज्यांची रोवणी आटोपली त्या धानाला शेवटच्या पाण्याची गरज असतांना निसर्गाने पाठ फिरविली आहे. त्यामुळे शेतात धान रोवलेले असतांनाही पाणी नसल्याने शेतजमिनीला तडे गेलेले दिसून येत आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांनी रोवणीसाठी लावलेला खर्चही आता निघण्याची आशा धुसर झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात भविष्याचे स्वप्न नसून केवळ अश्रू दिसून येत आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना शासनाने मदतीचा हात दयावा अशी अपेक्षा बळीराजाने वर्तविली आहे. मात्र जिथे निसर्गानेच दगा दिला तिथे सरकार साथ देईल काय? अशी ही भीती त्यांच्या मनात घर करुन बसली आहे. शेतकऱ्यांना आता खरोखरच मदतीची गरज आहे. (शहर प्रतिनिधी)