शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
3
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
4
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
5
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
6
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
7
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
8
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
9
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
10
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
11
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
12
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
13
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
14
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
15
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
16
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
17
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
18
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
19
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
20
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना योद्ध्यांचे कुटुंबीय अजुनही मदतीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 05:00 IST

राज्य शासनातर्फे कोरोना कर्तव्यावर असलेल्या कर्मचाºयांचा मृत्यू झाला तर अशा या कोरोना योद्धांच्या कुटुंबाला ५० लाख रूपयांची मदत दिली जाते. उल्लेखनीय म्हणजे आज मंगळवारी सकाळी भंडारा शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले रामभाऊ काटेखाये यांचा उपचारादरम्यान कोरोना ब्लॉकमध्ये मृत्यू झाला. दुसरे पोलीस कर्मचारी जवाहरनगर पोलीस ठाण्याती असून त्यांचे नाव नत्थू सोविंदा सार्वे आहे.

ठळक मुद्देपोलीस व आरोग्य विभागातील प्रत्येकी दोन कर्मचाऱ्यांचा समावेश

इंद्रपाल कटकवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कोरोना संकटकाळात आरोग्यासह पोलीस दलातील कर्मचाऱ्यांचे कसब पणाला लागले आहे. जीवाची पर्वा न करता कर्तव्य करीत असताना या दोन्ही विभागातील प्रत्येकी दोन कर्मचाऱ्यांना प्राण गमवावे लागले आहे. आता या मृत कोरोना योद्धांच्या कुटुंबांना शासन मदतीची अपेक्षा आहे.
राज्य शासनातर्फे कोरोना कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला तर अशा या कोरोना योद्धांच्या कुटुंबाला ५० लाख रूपयांची मदत दिली जाते. उल्लेखनीय म्हणजे आज मंगळवारी सकाळी भंडारा शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले रामभाऊ काटेखाये यांचा उपचारादरम्यान कोरोना ब्लॉकमध्ये मृत्यू झाला. दुसरे पोलीस कर्मचारी जवाहरनगर पोलीस ठाण्याती असून त्यांचे नाव नत्थू सोविंदा सार्वे आहे. आरोग्य विभागात कार्यरत चंद्रशेखर माटे यांचा २३ दिवसांपूर्वी मृत्यृ झाला. तर आशा वर्कर असलेल्या रेखा पारधी यांचा दोन महिन्यांपूर्वी कोरोनाने दगावल्या.
घरातील कमावत्या व्यक्तीचा असा दुर्देवी मृृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबाला आर्थिक आधाराची गरज आहे. नातेवाईक व मित्र मंडळींतर्फे थोडीफार मदत मिळाली परंतु शासकीय मदत लाख मोलाची ठरणार आहे. तिन्ही प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहे.

रामभाऊ काटेखाये
भंडारा शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले रामभाऊ हरिश्चंद्र काटेखाये (५५) यांचे आज मंगळवारी सकाळी कोरोनामुळे आयसोलेशन वॉर्ड येथे मृत्यू झाला. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा आप्त परिवार आहे.

रेखा दिनेश पारधी
तुमसर तालुक्यातील चिचोली येथे आशा वर्कर म्हणून रेखा दिनेश पारधी या कार्यरत होत्या. ३० जुलै रोजी कोरोनाने निधन झाले. त्यांच्या पतीचे पाच वर्षांपूर्वी मृत्यू झाला असून त्यांना तीन मुली आहेत.

नत्थू सोविंदा सार्वे
जवाहरनगर पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार पदावर कार्यरत नत्थू सोविंदा सार्वे यांचा कोरोनाने २० सप्टेंबर रोजी मृत्यू झाला. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. त्यांना शासन मदत मिळाली नाही

चंद्रशेखर माटे
तुमसर तालुक्यातील लेंडेझरी आरोग्य केंद्रात कार्यरत असलेले आरोग्य सेवक चंद्रशेखर कोठीराम माटे यांचा १३ सप्टेंबर रोजी मृत्यू झाला. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा आप्त परिवार आहे.

ज्याप्रमाणे सीमेवर जवान आपले रक्षण करीत आहेत, त्याप्रमाणेच कोरोना काळात आरोग्य तथा पोलीस विभागातील कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता कार्य करीत आहेत. मृत पावलेल्या कोरोना योध्दांना मनपूर्वक आदराजंली. त्यांच्या कुटुंबियांना सर्व शासकीय फायदे आहेत ते आम्ही पूर्णपणे मिळवून देऊ. -संदीप कदम, जिल्हाधिकारी

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या