शहरं
Join us  
Trending Stories
1
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
4
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
5
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
6
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
7
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
8
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
9
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
10
सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'
11
न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
12
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
13
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
14
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
15
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
16
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
17
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
18
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
20
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
Daily Top 2Weekly Top 5

सावित्रीच्या त्यागाची चंद्रपूर जिल्ह्यात फलश्रुती

By admin | Updated: September 22, 2014 23:15 IST

पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये देशात शेकडो वर्षे महिलांना चार भिंतीआड ठेवले जात होते. त्यामुळे महिलांना समाजात दुय्यम दर्जाचे स्थान होते. मात्र सावित्रीबाई फुले यांच्या त्यागातून आज अनेक महिला

राजकुमार चुनारकर - खडसंगीपुरुषप्रधान संस्कृतीमध्ये देशात शेकडो वर्षे महिलांना चार भिंतीआड ठेवले जात होते. त्यामुळे महिलांना समाजात दुय्यम दर्जाचे स्थान होते. मात्र सावित्रीबाई फुले यांच्या त्यागातून आज अनेक महिला प्रशासकीय सेवेसह सत्तेची फळे चाखत आहेत. जिल्ह्यातील १५ पंचायत समितीपैकी अकरा पंचायत समितीवर महिलांनी कब्जा केला आहे. आता जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदी विराजमान होऊन त्या मिनी मंत्रालयाचा डोलारा सांभाळणार आहेत.जाती व्यवस्थेने बरबटलेल्या देशात उच्च-नीचतेची दरी मिटवून समानता आणण्यासाठी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. आंबेडकर, शाहू महाराज, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज अशा अनेक समाज सुधारकांना अतोनात कष्ट उपसावे लागले. मानवाची प्रगती कशामध्ये आहे हे महात्मा फुले यांनी चागलेच ज्ञात होते. त्यामुळे त्यांनी बहुजनसाठी शाळा सुरू केल्यात व सावित्रीबाई फुले यांना शिकवून पहिली शिक्षिका बनविले. यासाठी त्यांना अनेक हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या.सर्व प्रकारच्या अधिकारापासून वंचित ठेवलेल्या महिलांच्या प्रगतीकरिता कुणीच पुढे आले नाही. मात्र फुले दाम्पत्यांनी महिलाच्या अधिकारासाठी संघर्ष उभारुन महिलांना शिक्षणाची दारे उघडून दिली. महिलांना शिकविण्याकरिता स्वत: सावित्रीबाई फुलेंना शिव्या खाव्या लागायच्या. मात्र या सर्व प्रकाराला न घाबरता सावित्रीने शिक्षणाचा दिवा घरोघरी लावण्यासाठी संघर्ष केला व सावित्रीने लावलेले त्याकाळातील रोपटे आज एकविसाव्या शतकात फळाने बहरले आहे. त्यामुळे अनेक महिला प्रशासकीय सेवेसह राजकारणात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत.मिनि मंत्रालयात काल रविवारी झालेल्या अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या निवडणुकीत अध्यक्ष म्हणून संध्या गुरुनुले तर उपाध्यक्ष म्हणून कल्पना बोरकर या मिनी मंत्रालयाच्या कारभारणी बनल्या. यासह जिल्ह्यातील बल्लारपर, राजुरा, सिंदेवाही, नागभीड, वरोरा, भद्रावती, मूल, सावली, गोंडपिपरी, जिवती व चिमूर पंचायत समितीवरही महिलाच सभापती बनून कारभार चालवित आहेत. शेकडो महिला ग्रामपंचायतच्या सरपंच म्हणून न्याय व्यवस्थेत सहभाग घेऊन यंत्रणा चालवित आहेत.पुरुषप्रधान संस्कृतीत चूल आणि मूल सांभाळून संसारात मर्यादीत असलेली स्त्री पुरुषप्रधान संस्कृतीला आता बगल देऊन पुढे निघाली आहे. आद्यशिक्षिका सावित्रीबाई फुलेंनी महिलाच्या प्रगतीबाबत बघितलेले स्वप्न आता चंद्रपूर जिल्ह्यात तरी पूर्ण झालेले दिसत आहे.(वार्ताहर)